IPLक्रिकेटटॉप बातम्या

IPL 2024 : सिक्सर किंगने मुंबई इंडियन्सवर ओढले ताशेर, म्हणाला, ‘रोहित शर्माला आणखी एक संधी…

आयपीएल आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्व खेळाडू आता आयपीएलच्या तयारीला लागलेले आहेत. दुसरीकडे रोहित शर्माही आयपीएलसाठी सज्ज होताना दिसत आहे. तसेच आयपीएल 2024 आधीच मुंबई इंडियन्सनं मोठा निर्णय घेतला होता. तर दहा वर्षानंतर मुंबईने कर्णधार बदलला आहे. रोहित शर्माची कर्णधारपदावरुन हाकलपट्टी करुन मुंबईने हार्दिक पांड्याकडे जबाबदारी सोपवली. तर मुंबई इंडियन्सच्या या निर्णायाचा सर्वांनाच धक्का बसला होता. रोहित शर्माच्या चाहत्यांनी आपली नाराजी सोशल मीडियावर व्यक्त केली होती. अशातच आता रोहित शर्माला टीम इंडियाचा माजी दिग्गज क्रिकेटरचा पाठिंबा मिळाला आहे. 

याबरोबरच मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला 5 वेळा आयपीएल चॅम्पियन बनवले आहे, असे युवराज सिंगचे मत आहे. अशा स्थितीत त्याला एका मोसमासाठी आणखी एक संधी द्यायला हवी होती. तर हार्दिक पांड्याबाबत युवराज सिंग म्हणाला आहे की, जर तुम्ही हार्दिकला परत आणत असाल तर तुम्ही हार्दिकला उपकर्णधार बनवू शकला असता. असे सांगत युवराज सिंगने रोहित शर्माची पाठराखण केली आहे.

यानंतर पुढे बोलताना युवराज सिंग म्हणाला आहे की, हार्दिक पांड्या हा अतिशय प्रतिभावान खेळाडू आहे आणि त्याने आयपीएलमधील दोन हंगामांसाठी गुजरात टायटन्सचे नेतृत्व केले आहे. पण आता आयपीएलच्या सर्वात मोठ्या संघाचे नेतृत्व करताना त्याला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

दरम्यान, आयपीएलमध्ये फ्रँचायझीला त्याच्या भविष्याचा विचार करावा लागतो. तसेच गुजरात टायटन्ससाठी हार्दिक पांड्या ज्या प्रकारे यशस्वी कर्णधार असल्याचे सिद्ध झाले ते लक्षात घेऊन मुंबई इंडियन्सने ही मोठी जबाबदारी पांड्यावर दिली असावी. याबरोबरच रोहित खेळत असतानाही त्याचा आता फक्त खेळाडू म्हणून संघात समावेश असणार आहे. आयपीएल 2008 च्या पहिल्या पर्वामध्ये एमएस धोनी टीम इंडियाचा कर्णधार होता.

आयपीएलच्या पहिल्या पर्वापासून तो सीएसके संघाचं कर्णधारपद पाहत होता.  2017 साली टीम इंडियाचा  कर्णधार म्हणून शेवटचा सामना खेळला. धोनीनंतर विराट कोहली टीम इंडियाचा पूर्णवेळ कर्णधार झाला. तोसुद्धा आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून खेळला आहे. मात्र आता रोहित पूर्णवेळ कर्णधार असताना खेळाडू म्हणून खेळणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार असताना आयपीएलमध्ये फक्त खेळाडू म्हणून खेळण्याची ही पहिलीच वेळ देखील ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Related Articles