आयपीएल 2024 च्या 68व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर चेन्नई सुपर किंग्जचं आव्हान आहे. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
चेन्नई सुपर किंग्ज – रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टिरक्षक), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग, महेश तिक्ष्णा
इम्पॅक्ट प्लेअर्स – शिवम दुबे, समीर रिझवी, प्रशांत सोळंकी, शेख रशीद, मुकेश चौधरी
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, कॅमेरून ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), कर्ण शर्मा, यश दयाल, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज
इम्पॅक्ट प्लेअर्स – स्वप्नील सिंग, अनुज रावत, सुयश प्रभुदेसाई, विजयकुमार विशक, हिमांशू शर्मा
या हाय-व्होल्टेज सामन्याद्वारे प्लेऑफचा चौथा संघ निश्चित होईल. कोलकाता, राजस्थान आणि हैदराबादनं प्लेऑफसाठी तिकीट निश्चित केलं आहे. आज चेन्नईचा संघ विजयी ठरला तर ते पुढील फेरी गाठतील. त्यांचे सध्या 13 सामन्यांत 14 गुण आहेत. सीएसकेनं मागील सामन्यात राजस्थानचा पराभव केला होता.
दुसरीकडे, पात्र होण्यासाठी आरसीबीला केवळ सामना जिंकावा लागेल असं नाही तर नेट रन रेटमध्ये सीएसकेपेक्षा चांगली कामगिरी करावी लागेल. जर आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 200 धावा केल्या तर त्यांना सीएसकेचा किमान 18 धावांनी पराभव करावा लागेल. त्याच वेळी, आरसीबीला लक्ष्याचा पाठलाग करून 11 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकावा लागेल.
आरसीबी विरुद्ध सीएसके सामन्यात पावसाचा धोका आहे. पावसामुळे सामना वाहून गेला तर दोन्ही संघाला प्रत्येकी एक-एक गुण मिळेल. अशा स्थितीत सीएसके प्लेऑफमध्ये प्रवेश करेल. CSK च्या खात्यात 15 गुण असतील तर RCB फक्त 13 गुणांपर्यंत पोहोचू शकेल. CSK गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. आरसीबी सातव्या स्थानावर आहे. आरसीबीनं मागील 5 सामन्यांमध्ये विजयाचा झेंडा फडकावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची साथ सोडणार का? हेड कोचच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण