आयपीएल 2024 शेवटच्या टप्प्यात आलं आहे. या हंगामातील उर्वरित फायनलचा थरार रविवारी (24 मे) रोजी रंगणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यामध्ये चेन्नईच्या स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल. केकेआरनं आयपीएलच्या इतिहासात 2 वेळा ट्रॉफी जिंकली आहे. तर हैदराबादनं सुद्धा 1 वेळा विजेतेपद पटकावलं आहे.
श्रेयस अय्यरच्या संघानं क्वालीफायर 1 मध्ये हैदराबादचा पराभव करुन फायनलमध्ये त्यांच स्थानं निश्चित केल. तर हैदराबादनं क्वालिफायर 2 सामन्यात राजस्थानचा पराभव करुन आयपीएल फायनलकडे आगेकूच केली.
या आयपीएल हंगामात केकेआर आणि हैदराबाद संघ 2 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यामध्ये केकेआरनं दोन्ही वेळेस बाजी मारली आहे. दोन्ही संघांचं हेड टू हेड रेकाॅर्ड पाहिलं तर केकेआर संघ आघाडीवर आहे. केकेआर आणि हैदराबाद (KKR vs SRH) यांच्यामध्ये आतापर्यंत 27 वेळा लढत झाली आहे. 18 सामन्यात केकेआरने बाजी मारली आहे. तर हैदराबादनं फक्त 9 सामन्यात विजय मिळवला आहे.
केकेआर विरुद्ध हैदराबादची सर्वोच्च धावसंख्या 228 राहिली आहे. तर हैदराबादविरुद्ध केकेआरची सर्वोच्च धावसंख्या 208 आहे. दोन्ही संघांमध्ये उद्या (24 मे) रोजी अटीतटीची लढत पाहायला मिळू शकते. केकेआरकडून सुनील नारायणनं 14 सामन्यांमध्ये 482 धावा ठोकल्या आहेत. त्यामध्ये त्यानं 3 अर्धशतकांसह 1 शतकदेखील झळकावलं आहे. फिरकीपटू वरुण चक्रवर्तीनं 14 सामन्यांमध्ये केकेआरसाठी 20 सर्वाधिक बळी घेतले आहेत. पर्पल कॅपच्या शर्यतीत तो तिसऱ्या स्थानी आहे.
हैदराबादसाठी ट्रेविस हेडनं 14 सामन्यांमध्ये 567 सर्वाधिक धावा केल्या आहेत. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो चौथ्या स्थानी आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज टी. नटराजननं 13 सामन्यांत हैदराबादसाठी सर्वाधिक 19 बळी घेतले आहेत. पर्पल कॅपच्या शर्यतीत तो चौथ्या स्थानी आहे.
शेवटच्या सामन्यात हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सनं माजी दिग्गज खेळाडू अनिल कुंबळे यांच्या रेकाॅर्डशी बरोबरी केली. कर्णधार असताना एका हंगामात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत कमिन्स दुसऱ्या स्थानी पोहचला. कमिन्सच्या या हंगामात कर्णधार म्हणून 17 विकेट्स झाल्या आहेत. 2010 मध्ये आरसीबीचे कर्णधार असताना कुंबळे यांनीदेखील 14 विकेट्स मिळवले होते. या यादीत कर्णधार म्हणून सर्वाधिक विकेट्स शेन वॉर्न यांनी घेतल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
पराभवानंतर आता लाखो रुपयांचा दंड! राजस्थानच्या ‘या’ खेळाडूवर बीसीसीआयनं केली कारवाई
राजस्थानच्या पराभवानंतर कर्णधार संजू सॅमसनची प्रतिक्रिया म्हणाला, “आमच्या गोलंदाजांवर…”
भारत-पाकिस्तान सामना होणार ‘या’ मैदानावर, मैदानाचे सौंदर्य पाहून चाहते थक्क!