आयपीएलचा 17वा हंगाम 22 मार्चपासून सुरू होत आहे. पहिला सामना गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात चेपॉक येथे होणार आहे. तर हा सामना चेन्नईत होणार आहे. सध्या फक्त 22 मार्च ते 7 एप्रिलपर्यंत आयपीएलचे वेळापत्रक आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखेनंतरच उर्वरित वेळापत्रक समोर येणार आहे. याआधी सनराईजर्स हैदराबादने एक मोठा बदल केला आहे.
याबरोबरच, दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेन हा सनराईजर्स हैदराबादचा प्रशिक्षक आहे. मात्र तो आयपीएल 2024 च्या हंगामातून ब्रेक घेणार आहे. मात्र तो पुढच्या हंगामात पुन्हा सनराईजर्स हैदराबादशी जोडला जाणार आहे. यामुळे आयपीएलच्या आगामी हंगामात जेम्स फ्रँकलिन हे सनरायझर्स हैदराबादचा नवा गोलंदाजी प्रशिक्षक असणार आहे. तसेच जेम्स फ्रँकलिनचा आयपीएलमधील प्रशिक्षकपदाचा हा पहिलाच अनुभव असणार आहे.
अशातच आयपीएल 2024 च्या हंगामापूर्वी सनरायझर्स हैदराबादने जर्सी देखील बदलली आहे. तसेच हैदराबादचे नेतृत्व एडिन मार्करमकडे होते. मात्र त्याच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन हंगामात हैदराबादला फार यश मिळालेलं नाही. 2022 मध्ये हैदराबाद आठव्या तर 2023 मध्ये 10 व्या स्थानावर होते. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादने एडिन मार्करमच्या जागेवर पॅट कमिन्सला कर्णधार केले आहे.
SUNRISERS HYDERABAD JERSEY FOR IPL 2024….!!!! pic.twitter.com/sC2XEzJeuu
— Johns. (@CricCrazyJohns) March 7, 2024
दरम्यान, पॅट कमिन्स हा आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. आयपीएलच्या 17 व्या मोसमासाठी डिसेंबर 2023 मध्ये मिनी ऑक्शन पार पडलं. सनरायजर्स हैदराबादने पॅटला या ऑक्शनमध्ये 20 कोटी 50 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं. तर ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क हा सर्वात महागडा ठरला. मिचेलसाठी केकेआर अर्थात कोलकाता नाईट रायडर्सने 24 कोटी 75 लाख रुपये मोजले होते.
एसआरएचचं पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक
एसआरएच विरुद्ध कोलकाता, 23 मार्च, संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटं
एसआरएच विरुद्ध मुंबई इंडियन्स, 27 मार्च, संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटं
एसआरएच विरुद्ध गुजरात टायटन्स, 31 मार्च, दुपारी 3 वाजून 30 मिनिटं
एसआरएच विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, 5 एप्रिल, संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटं.
आयपीएल 2024 साठी सनरायजर्स हैदराबाद टीम | पॅट कमिन्स (कॅप्टन), मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, अनमोलप्रीत सिंह, नितीश कुमार रेड्डी, एडेन मार्कराम, ग्लेन फिलिप्स, हेनरिक क्लासेन, उपेंद्र सिंह यादव, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, सनवीर सिंह, वाशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, मार्को जानसन, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, फजलहक फारूकी, उमरान मलिक, ट्रॅव्हिस हेड, जयदेव उनादकट, वानिंदु हसरंगा, झटवेध सुब्रमण्यन आणि आकाश सिंह.
महत्वाच्या बातम्या –
- पीवायसी एचडीएफसी बँक रॅकेट लीग 2024 स्पर्धेत कोल्टस, रॉकेट्स, मस्कीटर्स संघांची विजयी सलामी
- महाराष्ट्र श्री साठी मुंबईतच काँटे की टक्कर, शरीरसौष्ठवपटूंना मिळणार विम्याचे कवच