आयपीएल 2024 च्या 50व्या सामन्यात आज सनरायझर्स हैदराबादसमोर राजस्थान रॉयल्सचं आव्हान आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स – आम्ही प्रथम फलंदाजी करू. आम्ही जे सामने जिंकले त्यामध्ये प्रथम फलंदाजीच केली आहे. बहुधा हीच आमची ताकद आहे. ही विकेट चांगली दिसते.
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन – आम्हालाही परिस्थिती पाहता फलंदाजीच करायची होती. या हंगामात आम्ही चांगली कामगिरी केली आहे. आम्ही बऱ्याच गोष्टी चांगल्या प्रकारे करत आहेत. आम्हाला फक्त त्यावर टिकून राहायचं आहे.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
सनरायझर्स हैदराबाद – ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, अनमोलप्रीत सिंग, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जॅन्सन, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, टी नटराजन
इम्पॅक्ट प्लेअर्स – उमरान मलिक, मयंक मार्कंडे, एडन मार्करम, सनवीर सिंग, जयदेव उनाडकट
राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार/यष्टीरक्षक), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा
इम्पॅक्ट प्लेअर्स – जोस बटलर, टॉम कोहलर-कॅडमोर, शुभम दुबे, नवदीप सैनी, तनुष कोटियन
सनरायझर्स हैदराबादनं चालू हंगामात प्रथम फलंदाजी करताना आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे. मात्र धावांचा पाठलाग करताना त्यांचे फलंदाज फ्लॉप ठरले आहेत. गेल्या दोन सामन्यांत संघाला धावांचा पाठलाग करताना पराभवाचा सामना करावा लागला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील हैदराबादची अवस्था 150 धावांचा टप्पा ओलांडतानाच बिकट झाली होती. हैदराबादचा संघ 9 सामन्यात 5 विजय आणि 4 पराभवानंतर गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे.
दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सनं या हंगामात आपला दबदबा कायम ठेवला त्यांनी आतापर्यंत स्पर्धेत केवळ एकच सामना गमावला आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील संघ 9 सामन्यांतून 16 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. आजचा सामना जिंकताच ते प्लेऑफसाठी पात्र ठरतील.
महत्त्वाच्या बातम्या –
दुष्काळात तेरावा महिना! चेन्नईचे तब्बल 5 गोलंदाज विविध कारणांमुळे बाहेर
आंद्रे रसेल करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण! स्मृती मानधनाच्या प्रियकरानं दिली संधी
इंग्लंडच्या या खेळाडूला वयाच्या 23 व्या वर्षीच घ्यावी लागली निवृत्ती, कारण जाणून बसेल धक्का!