आयपीएल 2024 च्या पर्वाला सुरुवात होण्यासाठी एक महिन्याहून कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. 22 फेब्रुवारी रोजी बीसीसीआयने आयपीएलच्या १७ व्या हंगामाचे संपूर्ण वेळापत्रकही जाहीर केले आहे. याबरोबरच, यंदाच्या हंगामातील पहिला सामना गतविजेत्या चेन्नई आणि बंगळुरू यांच्यात 22 मार्च रोजी होणार आहे. गेल्या मोसमात सीएसकेने अंतिम सामन्यात गुजरातविरुद्ध रोमहर्षक विजय नोंदवला होता. आयपीएलच्या इतिहासात चेन्नईने एकूण ५ वेळा विजेतेपद पटकावले आहे. तसेच आज आम्ही तुम्हाला त्या पाच फलंदाजांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी गेल्या वर्षी सर्वाधिक धावा ठोकल्या होत्या.
आयपीएल 2023 मध्ये गुजरात टायटन्सचा सध्याचा कर्णधार शुभमन गिलने जबरदस्त कामगिरी केली होती. तर गिलने IPL 2023 मध्ये गुजरात टायटन्ससाठी फायनलसह 17 सामने खेळले होते. ज्यामध्ये त्याने 59.33 च्या सरासरीने आणि 157.8 च्या स्ट्राईक रेटने 890 धावा केल्या होत्या. तसेच गिलने गेल्या वर्षी 4 अर्धशतके आणि 1 शतक झळकावले होते.
याबरोबरच फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अंतिम फेरीत पोहोचण्यात अपयशी ठरला होता. परंतु आयपीएल 2023 मध्ये, फॅफ डू प्लेसिसने फलंदाजीने अप्रतिम कामगिरी करत आयपीएल 2023 मध्ये फाफ हा दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. तसेच फॅफने गेल्या मोसमात 14 सामने खेळत त्याने 56.15 च्या सरासरीने आणि 153.86 च्या स्ट्राइक रेटने 730 धावा केल्या होत्या. यामध्ये फॅफने 14 पैकी 8 सामन्यात फिफ्टी प्लस स्कोअर केले होते.
चेन्नई सुपर किंग्जचा शानदार फलंदाज डेव्हॉन कॉनवे दुखापतीमुळे यंदाच्या मोसमातून बाहेर होता, त्यानंतर CSK कॅम्पमधील अडचणी वाढत असल्याचे दिसत आहे. मात्र, गतवर्षी चेन्नई सुपर किंग्जला पाचवे विजेतेपद मिळवून देण्यात कॉनवेने निर्णायक भूमिका बजावली होती. डेव्हॉन कॉनवेने गेल्या मोसमात अंतिम सामन्यासह 16 सामन्यांमध्ये कॉनवेने 672 धावा केल्या होत्या. तर यामध्ये कॉनवेने 6 अर्धशतके झळकावली होती. तर या काळात कॉनवेची सरासरी 51.69 होती.
तसेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहलीनेही गेल्या मोसमात अप्रतिम कामगिरी केली होती. IPL 2023 मध्ये विराट कोहली हा चौथा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने 14 सामन्यात 2 शतके आणि 6 अर्धशतकांच्या मदतीने 639 धावा केल्या असून त्याची फलंदाजीची सरासरी 53.25 होती.
दरम्यान, गेल्यावर्षी यशस्वी जयस्वालच्या उत्कृष्ट फलंदाज करत शतक झळकावले होते. मात्र, या हंगामात यशस्वी जयस्वाल आपल्या अव्वल फॉर्ममध्ये फलंदाजी करत आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्सच्या चाहत्यांना यशस्वी जयस्वालचा फॉर्म असाच राहावा आणि राजस्थान रॉयल्सला 2008 नंतर दुसरे विजेतेपद पटकावण्यास त्यामुळे मदत होईल. तसेच गेल्या हंगामात यशस्वीने 14 सामन्यात 625 धावा केल्या होत्या. यावेळी त्याचा स्ट्राइक रेट 163.61 आणि फलंदाजीची सरासरी 48.07 होती.
महत्त्वाच्या बातम्या-
- काश्मीरचा हात नसलेला क्रिकेटर आमिर हुसैन लोन, जो चक्क पायानं करतो गोलंदाजी! सचिन तेंडुलकरही आहे चाहता
- IND vs ENG : कसोटी मालिका गमावल्यानंतर इंग्लडचा माजी कर्णधार संतापला; म्हणाला, ‘Bazball’मुळे इंग्लंड…