---Advertisement---

IND vs ENG : कसोटी मालिका गमावल्यानंतर इंग्लडचा माजी कर्णधार संतापला; म्हणाला, ‘Bazball’मुळे इंग्लंड…

On: रविवार, मार्च 10, 2024 5:03 PM
England Test Squad
---Advertisement---

IND vs ENG :  भारतीय संघाने इंग्लंडच्या बॅझबॉल नावाची टिमकी फोडून काढत पाचवा कसोटी सामना तीन दिवसांच्या आत एक डाव आणि ६४ धावांनी जिंकला आणि अंतिम कसोटीसह पाच सामन्यांची मालिका ४-१ अशी जिंकली आहे. तर या सामन्यात १०० वा कसोटीत सामना खेळणाऱ्या अश्विनने सामन्यात नऊ विकेटची कामगिरी केली. कुलदीप सामन्यात; तर यशस्वी जयस्वाल मालिकेत सर्वोत्तम ठरला. हैदराबाद येथील पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर भारताने पुढचे तीन सामने चार दिवसांत जिंकले होते. 

मात्र आता या मालिकेत इंग्लंडचा पराभव झाल्याने माजी कर्णधार नासेर हुसैनने निराशा व्यक्त केली. त्याचबरोबर इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’ शैलीवर संताप व्यक्त केला आहे. तसेच इंग्लंडचा माजी कर्णधार नासेर हुसैनने भारताविरुद्धच्या मालिकेतील ४-१ अशा पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने इंग्लंडच्या फलंदाजांना वैयक्तिक कामगिरीवर काम करण्याचा आणि ‘बॅसझबॉल’चे वेड सोडून देण्याचा सल्ला दिला आहे.

हुसैन म्हणाला, ”प्रतिस्पर्धी संघाकडे बघा. जीवनाच्या प्रत्येक पैलूप्रमाणे त्यांनी त्यांच्याकडून प्रयत्न केले आणि शिकले. मग आम्ही का कमी पडलो? झॅक क्रॉऊलीला चांगली सुरुवात मिळून मोठी धावसंख्या उभारता आली नाही. चेंडू अगदी नवीन असताना बेन डकेटने आक्रमक पद्धतीचा अवलंब केला. तसेच संपूर्ण मालिकेत बेन स्टोक्सची बॅट चालली नाही. कारण तो निव्वळ फलंदाज म्हणून खेळत होता हेही असू शकते. त्यामुळे आता फक्त तुमच्या स्वतःच्या खेळावर लक्ष केंद्रित करा आणि त्यात सुधारणा करा.”

पुढे बोलताना हुसैनने कसोटी क्रिकेटमध्ये ७०० विकेट्स पूर्ण करणारा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि ५०० ​​हून अधिक विकेट्स घेणाऱ्या अश्विनचे कौतुक करत म्हणाला आहे की, “बॅझबॉलबद्दल बरेच काही बोलले आणि लिहिले गेले आहे. या परिस्थितीत वैयक्तिक कामगिरी महत्त्वाची असते, असे मी यापूर्वीही म्हटले होते. या सामन्यात जिमी अँडरसन आणि रवींद्रचंद्रन अश्विन हे दोन खेळाडू खेळत होते. ते या खेळाचे महान खेळाडू बनले, कारण त्यांनी सतत आपला खेळ सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले.”

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---