---Advertisement---

IPL 2024 : आयपीएलच्या इतिहासात हे 7 खेळाडू पहिल्यांदाच उतरणार मैदानात, किंमत आणि कोण ते जाणून घ्या

IPL Trophy
---Advertisement---

आयपीएलचा 17वा हंगाम 22 मार्चपासून सुरु होणार आहे. तर चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर पहिला सामना सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे. त्यानंतर स्पर्धेला खऱ्या अर्थाने रंगत चढत जाणार आहे. तसेच आयपीएल स्पर्धेत खेळण्याची अनेक खेळाडूंची इच्छा असते. पण काहींना संधी मिळते तर काहींना नाही. ज्यांना संधी मिळते त्यांना चांगल्या कामगिरीच्या जोरावर आपल्याला सिद्ध करून दाखवावं लागतं. यंदाच्या आयपीएलमध्ये सात खेळाडू आपलं नशिब आजमावणार आहेत. चला जाणून घेऊयात त्यांच्याबाबत.

शामर जोसेफ –

आयपीएलच्या 17व्या हंगामात शामर जोसेफ हा वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज मिनी ऑक्शनमध्ये 20 लाखांच्या बेस प्राईसमध्ये दिसला होता. मात्र त्याला खरेदी करण्यात कोणीही रस दाखवला नाही. मात्र ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चमकदार कामगिरी करताना अनेकांचे डोळे त्याने फिरवले होते. तसेच लखनौ सुपर जायंट्स संघातून इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूडने माघार घेतल्या नंतर त्याच्या जागी जोसेफला संधी मिळाली आहे.

समीर रिझवी –

उत्तर प्रदेशचा युवा खेळाडू समीर रिझवी 20 लाख रुपयांच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरला होता. तर समीरला घेण्यासाठी लिलावात चढाओढ पहायला मिळाली होती. मात्र शेवटी सीएसकेने रिझवीला 8.4 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे. तसेच समीरही आयपीएलमध्ये पदार्पण करण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे.

रचिन रवींद्र –

न्यूझीलंडचा खेळाडू रचिन रवींद्र आयपीएल लिलावात पहिल्यांदाच पहायला मिळाला होता. त्यानंतर त्याला चेन्नई सुपर किंग्जने 1.8 कोटी रुपयांना खरेदी केले आहे. तसेच  आता रचिन सीएसकेकडून आयपीएल खेळण्यास सज्ज झाला आहे.

नुवान तुषारा – 

ज्युनियर मलिंगा फेम नुवान तुषाराला या आयपीएल लिलावात 50 लाख रुपये बेस प्राईस होती. त्याला मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने 4.8 कोटी रुपयांना विकत घेतले. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज या आयपीएलमध्ये पदार्पण करेल अशी अपेक्षा आहे. नुकतंच नुवाने बांगलादेशविरुद्धच्या टी20 सामन्यात हॅटट्रीक घेऊन लक्ष वेधून घेतलं आहे.

कुमार कुशाग्रा – 

आयपीएल लिलावात 20 लाखांच्या मूळ किंमतीसह असलेल्या युवा यष्टिरक्षक-सह-फलंदाज कुमार कुशाग्रासाठी दिल्ली कॅपिटल्सने 7.2 कोटी रुपये मोजले होते. तर कुशाग्रसाठी हा आयपीएलचा पहिलाच हंगाम आहेे.

गेराल्ड कोएत्झी –

आयपीएलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झीने 2 कोटी रुपये किमतीत एंट्री केली आहे. तर त्याला मुंबई इंडियन्सने 5 कोटींना विकत घेतले. कोएत्झीही आयपीएलमध्ये पदार्पण करणार आहे.

दिलशान मधुशंका –

लिलावात 50 लाखांच्या मूळ किमतीत दिसलेला श्रीलंकेचा डावखुरा वेगवान गोलंदाज दिलशान मधुशंकाला मुंबई इंडियन्सने विकत घेतले. 50 लाख रुपये बेस किंमत होती आणि लिलावात 4.6 कोटींना विकत घेतले आहे. तसेच मधुशंका मुंबईसाठी पहिला आयपीएल सामना खेळेल अशी अपेक्षा आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---