आयपीएल 2024 मध्ये आज (25 मार्च) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना पंजाब किंग्जशी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना आरसीबीच्या घरच्या मैदानावर म्हणजेच चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमवर होईल. बंगळुरूचा चेन्नईविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पराभव झाला होता, तर पंजाबनं पहिल्या सामन्यात दिल्लीवर शानदार विजय मिळवला होता.
पंजाब आणि बेंगळुरू हे दोन्ही संघ स्टार खेळाडूंनी भरलेले आहेत. अशा परिस्थितीत ड्रीम-11 संघ बनवण्यासाठी तुम्हाला खूप संघर्ष करावा लागेल. मात्र आम्ही तुमची ही समस्या दूर करणार आहोत. आम्ही तुम्हाला त्या अकरा खेळाडूंबद्दल सांगतोय, ज्यांना तुम्ही या सामन्यासाठी तुमच्या ड्रीम 11 संघात स्थान देऊ शकता.
यष्टिरक्षक म्हणून तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. पहिला जितेश शर्मा आणि दुसरा अनुज रावत. जितेशचा अलीकडचा फॉर्म आणि गेल्या हंगामातील त्याची कामगिरी लक्षात घेता त्याला संघात घेणं अधिक सुरक्षित वाटतं. तुम्ही अनुजला ग्रँड लीग संघात स्थान देऊ शकता आणि त्याला कर्णधार म्हणूनही आजमावू शकता. मात्र, सुरक्षित खेळायचं असेल, तर जितेश सर्वोत्तम आहे.
चिन्नास्वामीवर मॅच आहे अन् फलंदाजीत विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस नाहीत, असं कसं होईल? या मैदानावरील दोघांचा विक्रम अप्रतिम आहे. यासोबतच गब्बर म्हणजेच शिखर धवन आणि जॉनी बेअरस्टो तुमच्या टीममध्ये असणं आवश्यक आहे.
बंगळुरू विरुद्ध पंजाब सामन्यात अष्टपैलू खेळाडू तुम्हाला सर्वाधिक गुण मिळवून देऊ शकतात. ग्लेन मॅक्सवेलची संघात डोळे झाकून निवड करा. याशिवाय लियाम लिव्हिंग्स्टन, सॅम करन आणि कॅमेरून ग्रीन तुमचं नशीब रातोरात बदलू शकतात. ग्रीन आणि मॅक्सवेल हे कर्णधार म्हणून उत्तम पर्याय असतील. ग्रीननं गेल्या सामन्यात चांगली गोलंदाजी करत विकेट्स घेतल्या होत्या. कांगारूंचा हा अष्टपैलू खेळाडू बॅटनही योगदान देऊ शकतो.
मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांना तुम्ही गोलंदाज म्हणून संघात समाविष्ट करू शकता. सिराजनं या मैदानावर भरपूर क्रिकेट खेळलं आहे. तो चिन्नास्वामीमध्ये तुम्हाला खूप गुण मिळवून देऊ शकतो. अर्शदीप हा पंजाबचा प्रमुख गोलंदाज आहे.
बंगळुरू विरुद्ध पंजाब ड्रीम 11 टीम
यष्टिरक्षक – जितेश शर्मा
फलंदाज – शिखर धवन, विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), जॉनी बेअरस्टो
अष्टपैलू- ग्लेन मॅक्सवेल, लियाम लिव्हिंगस्टन, सॅम करन (उपकर्णधार), कॅमरून ग्रीन
गोलंदाज – मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबईच्या पराभवानंतर गुणतालिकेची स्थिती काय? जाणून घ्या ताजे अपडेट्स