गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना 24 मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. गुजरातनं प्रथम फलंदाजी करताना 168 धावा केल्या. मुंबईकडून जोपर्यंत रोहित शर्मा क्रीजवर होता, तोपर्यंत त्यांचा विजय जवळपास निश्चित दिसत होता. मात्र तो बाद झाल्यानंतर संघाची फलंदाजी कोलमडली. विशेषत: डेथ ओव्हर्समध्ये गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांनी अतिशय तगडी गोलंदाजी केली आणि मुंबईचा 6 धावांनी पराभव झाला.
या सामन्यापूर्वी राजस्थान रॉयल्सनं लखनऊ सुपर जायंट्सचा 20 धावांनी पराभव केला होता. या दोन्ही सामन्यांनंतर आयपीएलच्या गुणतालिकेत बदल झाला आहे. आता सर्व संघांनी आयपीएल 2024 मध्ये प्रत्येकी किमान एक सामना खेळला आहे. चला तर मग जाणून घेऊया एका सामन्यानंतर काय आहे पॉइंट्स टेबलची स्थिती.
पॉइंट टेबलमध्ये राजस्थान रॉयल्स अव्वल स्थानावर असून त्यांचे सध्या 2 गुण आहेत. संघाचा धावगती +1.000 आहे. चेन्नई सुपर किंग्ज दुसऱ्या स्थानावर असून त्यांचेही 2 गुण आहेत. परंतु त्यांची धावगती +0.779 आहे. तिसऱ्या स्थानावर असलेल्या पंजाब किंग्जचेही 2 गुण आहेत. पंजाबची धावगती सध्या +0.455 आहे.
मुंबईविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर, गुजरात जायंट्सचे 2 गुण झाले आहेत. परंतु धावगती +0.300 असल्यामुळे ते चौथ्या स्थानावर आहेत. कोलकाता सध्या 2 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. संघाची धावगती +0.200 आहे. इतर 5 संघ सध्या आपलं खातं उघडू शकलेले नाहीत.
आज (25 मार्च) आयपीएलमध्ये फक्त एकच सामना खेळला जाणार आहे. आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर पंजाब किंग्जचं आव्हान असेल. पंजाबनं त्यांच्या पहिल्या सामन्यात दिल्लीचा 4 गडी राखून पराभव केला होता. आता बेंगळुरूचा पराभव करून ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचू शकतात. दुसरीकडे, आरसीबीला त्यांच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध 6 गडी राखून मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे फाफ डू प्लेसिस आणि त्यांची सेना आज आयपीएल 2024 मधील पहिला विजय नोंदवण्याच्या इराद्यानं मैदानात उतरतील.
महत्त्वाच्या बातम्या-
रोमहर्षक सामन्यात गुजरात टायटन्सचा मुंबई इंडियन्सवर अवघ्या 6 धावांनी विजय