आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच धावांचा पाऊस पडतोय. आतापर्यंत झालेल्या 18 सामन्यांमध्ये फलंदाजीचे अनेक विक्रम मोडले गेले. सनरायझर्स हैदराबादनं आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या केली. तर केवळ 18 सामन्यांमध्ये 300 षटकारांचा आकडाही पार केला गेला. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, एवढे षटकार कोणत्या खेळाडूंनी मारले असतील? चला तर मग जाणून घेऊया आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या टॉप-5 फलंदाजांबद्दल.
आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या टॉप-5 फलंदाजांच्या यादीत तीन परदेशी आणि दोन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे या यादीतील दोन्ही भारतीय खेळाडू अनकॅप्ड आहेत! शुक्रवार, 5 एप्रिल रोजी, चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध झालेल्या सामन्यात हैदराबादच्या अभिषेक शर्मानं 4 षटकार ठोकले. यासह तो आयपीएलच्या या हंगामात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या टॉप-5 फलंदाजांमध्ये सामिल झाला.
या 4 षटकारांसह अभिषेकच्या नावावर या मोसमात 15 षटकार झाले आहेत. आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत सनरायझर्स हैदराबादचा हेनरिक क्लासेन पहिल्या क्रमांकावर आहे. या यादीतील दुसरा भारतीय अनकॅप्ड खेळाडू म्हणजे राजस्थान रॉयल्सचा रियान पराग. पराग या हंगामात तुफान फॉर्मात दिसतोय. आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. रियान परागनं या हंगामात आतापर्यंत 12 षटकार मारले असून तो या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.
आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीतील दुसरे दोन खेळाडू म्हणजे लखनऊ सुपर जायंट्सचा निकोलस पूरन आणि कोलकाता नाईट रायडर्सचा सुनील नारायण. या दोघांनीही 12-12 षटकार मारले आहेत.
IPL 2024 मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे खेळाडू
हेन्रिक क्लासेन – 17
अभिषेक शर्मा- 15
रियान पराग- 12
निकोलस पूरन – 12
सुनील नारायण- 12
आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक चौकार मारणाऱ्या खेळाडूंबद्दल बोलायचं झालं तर या यादीत विराट कोहली, साई सुदर्शन, शिखर धवन, डेव्हिड वॉर्नर आणि ट्रॅव्हिस हेड यांचा समावेश आहे.
आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक चौकार मारणारे फलंदाज
विराट कोहली- 17
साई सुदर्शन- 16
शिखर धवन- 16
डेव्हिड वॉर्नर – 15
ट्रॅव्हिस हेड- 15
महत्त्वाच्या बातम्या-
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अभिषेक शर्माची एंट्री, पर्पल कॅपवर मोहित शर्माचा ताबा
आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत भारताला मिळालेत ‘हे’ 3 स्टार, लवकरच दिसतील टीम इंडियात । IPL 2024
अवघ्या 12 चेंडूत केलं काम तमाम! अभिषेक शर्मानं फोडून काढली चेन्नईची गोलंदाजी