आयपीएल 2024 चा अंतिम सामना 26 मे रोजी चेन्नईच्या चेपॉक क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्ससमोर सनरायझर्स हैदराबादचं आव्हान असेल.
आयपीएल चॅम्पियन बनणाऱ्या संघाला विजेतेपदासह मोठी रक्कम मिळणार आहे. तसेच चॅम्पियन संघाव्यतिरिक्त, उपविजेता, प्लेऑफमधील इतर दोन संघ व ऑरेंज आणि पर्पल कॅप विजेते यांच्यावरही पैशांचा वर्षाव केला जाईल. चला तर मग, या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला आयपीएल 2024 मध्ये संघांना आणि खेळाडूंना मिळणाऱ्या बक्षीस रकमेबद्दल माहिती देणार आहोत.
आयपीएल 2024 च्या विजेत्या संघाला ट्रॉफी व्यतिरिक्त 20 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळणार आहे. विजेत्याशिवाय उपविजेत्या संघालाही मोठी रक्कम मिळेल. या हंगामात उपविजेता ठरणाऱ्या संघाला 13 कोटी रुपये मिळणार आहेत. याशिवाय तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या राजस्थान रॉयल्सला 7 कोटी रुपये आणि चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 6.5 कोटी रुपये दिले जातील. एकूणच प्लेऑफमध्ये पोहोचणाऱ्या चारही संघांना कोट्यवधी रुपये मिळणार आहेत.
संघाव्यतिरिक्त, आयपीएल 2024 मध्ये खेळाडूंना वैयक्तिक कामगिरीसाठी देखील बक्षीस मिळणार आहे. स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅपसह 15 लाख रुपये दिले जातील. तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपसह 15 लाख रुपये मिळतील. सध्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली 714 धावांसह आघाडीवर आहे. तर पर्पल कॅपच्या शर्यतीत पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल 24 विकेट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे.
आयपीएल 2024 मध्ये मिळणारी बक्षीस रक्कम
विजेता संघ – 20 कोटी रुपये
उपविजेता संघ – 13 कोटी रुपये
तिसऱ्या क्रमांकाचा संघ – 7 कोटी रुपये
चौथ्या क्रमांकाचा संघ – 6.5 कोटी रुपये
ऑरेंज कॅप – 15 लाख रुपये
पर्पल कॅप – 15 लाख रुपये
उदयोन्मुख खेळाडू – 15 लाख रुपये
मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर – 12 लाख रुपये
पॉवर प्लेअर ऑफ द सीझन – 15 लाख रुपये
सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन – 12 लाख रुपये
गेम चेंजर ऑफ द सीझन – 12 लाख रुपये
महत्त्वाच्या बातम्या –
प्लेऑफमध्ये आरसीबीचा पराभव करणं पडतं महागात! समोर आला अनोखा योगायोग
आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस आहे का? पावसानं खोळंबा घातला तर कोणता संघ बनेल चॅम्पियन?
काय सांगता! टी20 विश्वचषकात खेळणारा एकही भारतीय खेळाडू आयपीएलच्या फायनलमध्ये नाही!