सध्या सगळीकडे आयपीएलच्या 17 व्या मोसमाचा माहोल तयार झाला आहे. क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. याबरोबरच निवडणुकांमुळे 17 व्या हंगामातील फक्त पहिल्या 17 दिवसांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार 22 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान एकूण 3 डबल हेडरसह 21 सामने पार पडणार आहेत. त्याआधी एक एक करुन अनेक खेळाडू आपल्या टीमसोबत जोडले जात आहेत. तर या 17 व्या हंगामानिमित्ताने आपण 5 वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबई इंडियन्सच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हन काय असू शकते याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.
आयपीएलच्या 17 व्या हंगामात भारतीय संघाचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना दिसणार आहे . तर मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा यावेळी फलंदाज म्हणून संघात खेळणार आहे. मात्र, रोहित शर्मा त्याच्या अनुभवाचा वापर करून हार्दिक पांड्याला कर्णधारपदासाठी मदत करताना नक्कीच पहायला मिळेल.
याबरोबरच हार्दिक पांड्याने 2015 मध्ये मुंबई इंडियन्सकडून अष्टपैलू म्हणून पदार्पण केले. त्यानंतर तो प्रथमच मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सांभाळताना दिसणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईने शेवटचे 2020 मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. आता हार्दिक पांड्याकडून एमआयच्या चाहत्यांना अपेक्षा आहे की यावेळी हार्दिक त्याच्या नेतृत्वाखाली तीन वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवू शकेल.
𝙊𝙣𝙚 𝙨𝙩𝙚𝙥 𝙖𝙩 𝙖 𝙩𝙞𝙢𝙚 🏃#OneFamily #MumbaiIndians pic.twitter.com/lwQsHBey0R
— Mumbai Indians (@mipaltan) March 13, 2024
अशातच मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 24 मार्च रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध खेळणार आहे. रोहित शर्मा आणि इशान किशन फलंदाजी करताना डावाची सुरुवात करताना दिसतील अशी अपेक्षा आहे. तर मधल्या फळीत सूर्यकुमार यादव आणि टीम डेव्हिड, कर्णधार हार्दिक पंड्या असतील. तसेच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीचे नेतृत्व करताना दिसतो. तर ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फ त्याला साथ देताना दिसणार आहे.
गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन :- रोहित शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, दिलशान मदुशंका.
महत्त्वाच्या बातम्या-
- IPL 2024 : आयपीएलच्या 17व्या हंगामापूर्वी सरफराज खानवर हा संघ लावू शकतो बाजी
- दिल्ली कॅपिटल्सची WPL 2024 च्या अंतिम फेरीत धडक, गुजरात जायंट्सचा सात गडी राखून पराभव