आयपीएल 2025 चे नियोजन सुरू झाले आहे. यावेळी मेगा लिलाव होणार आहे. त्यामुळे अनेक खेळाडूंचे संघ बदलतील. दरम्यान, आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बीसीसीआय या स्पर्धेतील सामन्यांची संख्या वाढविण्याचा विचार करत आहे. मात्र या हंगामात केवळ 74 सामने खेळले जाण्याची शक्यता आहे. एका वृत्तानुसार, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी म्हटले आहे की, आयपीएलमध्ये सामने वाढवले जाऊ शकतात.
‘इकॉनॉमिक टाईम्स’मधील बातमीनुसार जय शाह म्हणाले की, “आम्ही अद्याप आयपीएल 2025 साठी 84 सामने आयोजित करण्याचा निर्णय घेतलेला नाही. खेळाडूंवर आधीच खूप ताण आहे. हा कराराचा भाग आहे. पण 74 सामने खेळायचे की 84 सामने हे बीसीसीआय लवकरच ठरवेल. तसेच बीसीसीआयच्या मीडिया अधिकार आणि प्रायोजकत्व करारानुसार आयपीएल 2025 आणि 2026 च्या सीझनमध्ये 84 सामने खेळायचे आहेत.
बीसीसीआय आयपीएलमधील आणखी सामने वाढवण्याची योजना आखण्याची शक्यता आहे. 2025 आणि 2026 साठी 84 सामन्यांची योजना होती. मात्र यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. यानंतर आयपीएल 2027 मध्ये देखील 94 सामने आयोजित करण्याची योजना आखली जाऊ शकते. अहवालांवर विश्वास ठेवला तर, आयपीएल टीव्ही आणि डिजिटल राइट्सचे मालक स्टार इंडिया आणि वायकोन18, 74 सामन्यांच्या बाजूने आहेत. तर फ्रँचायझी 84 सामन्यांच्या बाजूने आहे.
मागील मोसमात मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक होती. यंदाच्या लिलावापूर्वी संघ आता अनेक बदल करू शकतो. लिलावात सर्वांच्या नजरा रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांच्यावर असतील. आयपीएल 2024 पूर्वी संघाने रोहितला कर्णधारपदावरून दूर केले. त्याच्या जागी हार्दिक पांड्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रोहितने कर्णधारपद सोडल्यानंतर पांड्याला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले होते.
हेही वाचा-
टीम इंडियाला वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये वेगवेगळे प्रशिक्षक; हेड कोच गंभीरच्या ‘निर्णयावर’ जय शहांची मोठी प्रतिक्रिया
रोहित-विराट दुलीप ट्रॉफी स्पर्धेत का खेळणार नाहीत? जय शहांनी सांगितले खरे कारण
व्हीव्हीएस लक्ष्मणने स्वीकारली बीसीसीआयची ऑफर, आयपीएल संघाचा प्रशिक्षक बनण्याच्या चर्चांना पूर्णविराम