---Advertisement---

IPL 2025: भुवनेश्वर कुमारला बाहेर ठेवणं आरसीबीला महागात पडणार?

On: शनिवार, मार्च 22, 2025 8:06 PM
---Advertisement---

आयपीएल 2025चा सलामी सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात रंगत आहे. मात्र, या सामन्यासाठी आरसीबीने अनुभवी भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला त्यांच्या अंतिम प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिलेले नाही. संघाच्या या निर्णयावर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येत आहेत, शिवाय आरसीबीच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का आहे.

भुवनेश्वर कुमार हा आयपीएलमधील सर्वाधिक यशस्वी भारतीय वेगवान गोलंदाजांपैकी एक मानला जातो. त्याच्या स्विंग आणि डेथ ओव्हरमधील प्रभावी गोलंदाजीमुळे तो संघासाठी महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे आरसीबीच्या चाहत्यांनी आणि क्रिकेट तज्ज्ञांनी या निर्णयावर आश्चर्य व्यक्त करत आहेत.

पाहा दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन –

राॅयल चॅलेंजर्स बेंगळुरु : विराट कोहली, फिलिप साल्ट (विकेटकीपर), रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, रसिक दार सलाम, सुयश शर्मा, जोश हेझलवूड, यश दयाल

कोलकाता नाईट रायडर्स : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, अंगकृष रघुवंशी, सुनील नारायण, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती

दोन्ही संघाच्या हेड टू हेड रेकाॅर्डबद्दल बोलायचे झाल्यास, आतापर्यंत यासंघांमध्ये 34 सामने खेळल्या गेल्या आहेत. ज्यात केकेआरने 20 तर आरसीबीने 14 सामने जिंकल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---