जसप्रीत बुमराहला पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्यासाठी अजून काही वेळ वाट पाहावी लागू शकते. जसप्रीत दुखापतीच्या कारणाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा खेळू शकला नाही. आता त्याच्या फिटनेस वर एक नवीन अपडेट समोर येत आहे की, कदाचित आयपीएल 2025 स्पर्धेच्या सुरुवातीच्या आठवड्यात तो कोणताही सामना खेळू शकणार नाही. एका मीडिया रिपोर्ट नुसार जसप्रीत बुमराह एप्रिल महिन्यात मुंबई इंडियन्सच्या ट्रेनिंग कॅम्प मध्ये सामील होऊ शकतो. तसेच आयपीएल 2025 स्पर्धेची सुरुवात 22 मार्चपासून होणार आहे.
टाइम्स ऑफ इंडियाला माहिती देताना बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, जसप्रीत बुमराहचा मेडिकल रिपोर्ट चांगला आहे. तसेच त्याने गोलंदाजीचा अभ्यास चालू केला आहे, पण त्याची सुरुवातीच्या आठवड्यात आयपीएल स्पर्धा खेळण्याची शक्यता खूप कमी आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार एप्रिल महिन्यामध्ये तो संघात परतू शकतो.
जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्स संघासाठी स्पर्धेतील पहिले तीन-चार सामने खेळू शकणार नाही. असे तसेच सांगितले जात आहे की, जसप्रीत पूर्ण ताकदीने बॉलिंग करू शकत नाही आहे. रिपोर्ट्स मध्ये सांगितले जात आहे की, हळूहळू त्याच्या फिटनेस मध्ये सुधार होऊन त्याचा गोलंदाजीचा वेग वाढेल. जोपर्यंत जसप्रीत बुमराह वेगाने गोलंदाजी करत नाही तोपर्यंत त्याला फिट म्हणून घोषित करता येणार नाही. तसेच लखनऊ सुपर जायंट्स संघाचा वेगवान गोलंदाज मयंक यादव सुद्धा पूर्ण रित्या फिट नाही. तोही एप्रिल महिन्यामध्ये लखनऊ ट्रेनिंग कॅम्प मध्ये सामील होईल.
जसप्रीत बुमराहला ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिकेदरम्यान कमरेमध्ये त्रास सुरू झाला होता. तसेच सिडनी कसोटीच्या दुसऱ्या डावात गोलंदाजीसाठी तो मैदानात आला नाही. त्यानंतर मेडिकल टीमने त्याच्यावर पूर्णपणे काम केले. पण चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत तो पूर्ण पणे फिट नसल्यामुळे स्पर्धा खेळू शकला नाही.
हेही वाचा
IND vs NZ: टीम इंडियासाठी हे चार खेळाडू ठरणार ट्रम्प कार्ड, फायनलमध्ये किवींचा पराभव निश्चित?
आयपीएलची ताकद! पाकिस्तानचा क्रिकेटपटू दुसऱ्या देशाचे नागरिकत्व घेऊन स्पर्धेत सामील होणार
CT 2025: टीम इंडियाचा ‘ब्रह्मास्त्र’ फायनलमध्ये न्यूझीलंडसाठी घातक ठरणार?