आयपीएल 2025 मधील 17वा सामना आज (05 एप्रिल) चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवला जात आहे. हा सामना चेन्नईच्या होम ग्राऊंडवर म्हणजेच एम ए चिंदबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यात चेन्नईच्या प्लेइंग इलेव्हमध्ये बदल करण्यात आले आहे. जेमी ओव्हरटनच्या जागी डेव्हाॅन काॅनवे तर राहुल त्रिपाठीच्या जागी मुकेश चाैधरीचा समावेश करण्यात आला आहे.
पाहा दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन-
दिल्ली कॅपिटल्स: जेक फ्रेझर-मॅकगर्क, केएल राहुल (विकेटकीपर), अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, समीर रिझवी, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, विप्रज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा
चेन्नई सुपर किंग्ज: रचिन रवींद्र, डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), विजय शंकर, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, मुकेश चौधरी, खलील अहमद, मथीशा पाथिराना
दोन्ही संघांच्या हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर, चेन्नईचं वरचढ असल्याचे दिसून येते. आयपीएलमध्ये चेन्नई आणि दिल्ली यांच्यात आतापर्यंत 30 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी सीएसकेने 19 सामने जिंकले आहेत, तर दिल्लीने 11 वेळा विजय मिळवला आहे. या आकडेवारीवरून असे स्पष्ट होते की येथे चेन्नईचा दबदबा आहे. जर आपण शेवटच्या 5 सामन्यांबद्दल बोललो तर चेन्नई तिथेही थोडे पुढे आहे. दिल्लीने पाचपैकी दोन सामने जिंकले आहेत तर चेन्नईने तीन वेळा विजय मिळवला आहे.





टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये रंगणार दिग्गजांची मैफल! विश्वचषकासाठी ‘स्टार’ कॉमेंट्री पॅनेलची घोषणा