---Advertisement---

DC vs RCB: कृणाल पांड्याची अष्टपैलू खेळी, आरसीबीची विजयी हॅट्ट्रीक

On: सोमवार, एप्रिल 28, 2025 6:43 AM
---Advertisement---

विराट कोहली आणि कृणाल पांड्या यांच्या शानदार फलंदाजीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा 6 विकेट्सने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 162 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, आरसीबीने विराट कोहली आणि कृणाल पांड्याच्या शानदार अर्धशतकांच्या मदतीने 18.3 षटकांत 4 विकेट्स गमावून 163 धावांचे लक्ष्य गाठले. कृणाल पांड्याने 9 वर्षांनंतर अर्धशतक ठोकण्याचा चमत्कार केला. कृणालने 47 चेंडूत 73 धावांची नाबाद खेळी केली. ज्यात त्याने 5 चौकार आणि 4 षटकार मारले.

आरसीबीने या हंगामात 7 सामने जिंकले आहेत. घराबाहेर खेळलेले सर्व 6 सामने जिंकण्याचा शानदार पराक्रम केला आहे. एवढेच नाही तर, आरसीबीने या हंगामात लक्ष्याचा पाठलाग करताना सर्व चारही सामने जिंकले आहेत. दिल्लीच्या पराभवामुळे आरसीबीने 14 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. गुजरात टायटन्स संघ टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. मुंबई इंडियन्स संघ तिसऱ्या स्थानावर आहे. मुंबईचे 12 गुण आहेत. दिल्ली 12 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

यापूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या आरसीबी संघाने भुवनेश्वर कुमारच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर यजमान दिल्ली कॅपिटल्सला 162/8 धावांवर रोखले. आरसीबीसाठी भुवनेश्वरने चार षटकांत 33 धावांत तीन बळी घेतले तर जोश हेझलवूडने 2 बळी घेतले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---