आयपीएल 2025 मध्ये सलग पहिल्या पाच सामन्यांपैकी चार सामन्यांमध्ये विजय मिळवणाऱ्या गुजरात टायटन्स संघाला सहाव्या सामन्यात 6 विकेट्सने पराभव पत्करावा लागला. लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या या सामन्यात, गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 6 गडी गमावून 180 धावा केल्या, ज्याचा पाठलाग लखनऊ संघाने 19.3 षटकांत 4 गडी गमावून केला. या सामन्यात निकोलस पूरननी एलएसजी संघासाठी फलंदाजीत महत्त्वाची भूमिका बजावली तो अर्धशतक झळकावण्यात यशस्वी झाला.
या सामन्यात जेव्हा लखनऊ सुपर जायंट्स संघ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आला तेव्हा रिषभ पंतने एडन मार्करामसह त्यांच्यासाठी डावाची सुरुवात केली. लखनऊच्या संघाला पहिला धक्का 65 धावांवर असताना कर्णधार रिषभ पंतच्या रूपात बसला, जो 21 धावांची खेळी खेळल्यानंतर प्रसिद्ध कृष्णाने बाद केला. यानंतर, फलंदाजीसाठी आलेल्या निकोलस पूरनने मार्करामला चांगली साथ दिली आणि दुसऱ्या विकेटसाठी दोघांमध्ये 29 चेंडूत 58 धावांची भागीदारी झाली, ज्यामुळे या सामन्यात लखनऊचा विजय पूर्णपणे निश्चित झाला.
Where can you find fireworks tonight? ???? ????
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2025
In Lucknow, from the bat of Nicholas Pooran ????
Updates ▶ https://t.co/VILHBLEerV #TATAIPL | #LSGvGT | @nicholas_47 pic.twitter.com/Lb9E6XQoPB
या सामन्यात निकोलस पूरनने 34 चेंडूत 1 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 61 धावा केल्या. या विजयासह, लखनऊ संघाने आता टॉप-4 मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे, ज्यामध्ये त्यांचे 6 सामन्यांत चार विजयांसह 8 गुण आहेत.






