---Advertisement---

जितेश शर्मा ‘नॉट आऊट’ का ठरला? पाहा काय सांगतो आयपीएल नियम

On: बुधवार, मे 28, 2025 1:01 PM
---Advertisement---

आयपीएल 2025 शेवटच्या लीग सामन्यात राॅयल चॅलेंजर्स बेंगळुरुने (RCB) लखनऊ सुपर जायंट्सचा दारुण पराभव केला. या सामन्याचा हिरो जितेश शर्मा ठरला. जो आरसीबी संघाचा प्रभारी कर्णधार होता. त्याने कर्णधारपदाला साजेल अशी खेळी करत संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला. त्याने 33 चेंडूत 85 धावा करत मॅच विनिंग Match-winning Knock खेळी खेळली. मात्र, या लढतीत एक चर्चेचा विषय ठरलेली घटना घडली. जितेश शर्माला यांना ‘मांकड’ प्रकारच्या रनआउटमधून थोडक्यात बचाव मिळाला.

सामन्याच्या 17व्या षटकात लखनऊचा गोलंदाज Digvesh Rathi दिग्वेश राठीने चेंडू टाकण्याआधीच नॉन-स्ट्रायकर एंडवर बेल्स उडवल्या. त्यावेळी जितेश शर्मा क्रीजच्या बाहेर होता. राठीने लगेच रनआउटसाठी अपील केलं. मैदानी पंचांनी विचारल्यावर राठीने अपील कायम ठेवली आणि प्रकरण थेट थर्ड अंपायरकडे गेलं. Third Umpire Decision

थर्ड अंपायर उल्हास गांधी यांनी रिप्लेमधून पाहिलं की राठीचा पाय आधीच पॉपिंग क्रीज पार झाला होता, म्हणजेच त्याची डिलिव्हरी स्ट्राइड पूर्ण झाली होती. त्यामुळे जितेश शर्मला ‘नॉट आऊट’ ठरवण्यात आलं. Mankad Controversy IPL 2025

निर्णय स्क्रीनवर झळकल्या नंतर लखनऊचा कॅप्टन रिषभ पंतने अपील मागे घेतल्याचे सूचित केले. त्यानंतर जितेशने त्याला गळाभेट करत आनंद व्यक्त केला. पंत म्हणाला की, “जरी थर्ड अंपायरने आऊट दिलं असतं, तरी मी अपील परत घेतली असती. हे माझं हक्क आहे.”

जितेश शर्मा त्यावेळी 25 चेंडूत 57 धावांवर खेळत होता. त्यानंतर त्याने 33 चेंडूत नाबाद 85 धावा करत आरसीबीला 228 धावांचं मोठं लक्ष्य 6 विकेट्स आणि 8 चेंडू राखून गाठून दिलं. आयपीएलच्या इतिहासात आरसीबीचा हा सर्वात मोठा रनचेज होता.

या विजयासह RCB क्वालिफायर 1 मध्ये पोहोचली असून 29 मे रोजी ते पंजाब किंग्सविरुद्ध मुल्लांपुरमध्ये खेळतील. दुसरीकडे, गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात 30 मे रोजी एलिमिनेटर सामना होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---