---Advertisement---

KKR vs RCB: आरसीबीसमोर 175 धावांचे आव्हान, केकेआरच्या गोलंदाजांची परीक्षा!

---Advertisement---

IPL 2025 RCB VS KKR: आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील सलामी सामन्यात आरसीबी आणि केकेआर आमने सामने आहेत. पहिल्या डावात खेळताना केकेआरने मर्यादित 20 षटकात 174 धावा केल्या, केकेआरसाठी सलामीसाठी क्विंटन डिकाॅक-सुनिल नारायणची जोडी मैदानात उतरली, पण पहिल्याच षटकात केकेआरला क्विंटन डिकाॅकच्या रुपाने पहिला धक्का बसला, त्यानंर कर्णधार अजिंक्य रहाणेने (56 धावा) संघाला सावरत अर्धशतकी खेळी खेळली, त्याने सुनिल नारायणसोबत दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागिदारी रचली, सुनिल नारायणने 44 धावा केल्या.

केकेआर संघाच्या 107 धावसंख्येवर 10व्या षटकात केकेआरला नारायणच्या रुपाने दुसरा धक्का बसला, त्याला रसिक दर सलामने तंबूत पाठवले. यानंतर कृणाल पांड्याने अजिंक्य रहाणेला 56 धावांवर बाद केले, यानंतर आरसीबीने सामन्यात कमबॅक केला. आरसीबीने कसून गोलंदाजी केली. परिणामी केकेआरच्या फलंदाजाना खेळपट्टीवर टिकता आले नाही. रिंकू सिंग (12 धावा) आंद्रे रसल (4 धावा) स्वस्तात बाद झाले. आरसीबीकडून कृणाल पांड्याने निर्णयाक कामगिरी केली. त्याने 4 षटकात 29 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. दरम्यान आरसीबीला सामना जिंकण्यासाठी 175 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. केकेआरकडेही आक्रमक गोलंदाजी युनिट आहे. त्यामुळे धावांचा पाठलाग करणे आरसीबीला सोपे राहणार नाही.

पाहा दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन –

राॅयल चॅलेंजर्स बेंगळुरु : विराट कोहली, फिलिप साल्ट (विकेटकीपर), रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, रसिक दार सलाम, सुयश शर्मा, जोश हेझलवूड, यश दयाल

कोलकाता नाईट रायडर्स : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, अंगकृष रघुवंशी, सुनील नारायण, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---