---Advertisement---

हैदराबादकडून केकेआरचा लाजिरवाणा पराभव, कर्णधार रहाणे म्हणाला…

---Advertisement---

आयपीएल 2025 च्या 68व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) कोलकाता नाईट रायडर्स (Kolkatta knight riders) विरूद्धच्या शेवटच्या लीग सामन्यात केकेआरच्या गोलंदाजांना धो धो धुतले. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली एसआरएच संघाने केकेआरचा 110 धावांनी पराभव केला.

पहिल्या डावात खेळताना सनरायझर्स हैदराबादने मर्यादित 20 षटकात 278-3 धावा केल्या, ज्यामध्ये हेनरिक क्लासेनने (105) शतकी खेळी खेळली. तर लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआर संघाला 18.4 षटकात सर्व गडी गमावून 168 धावा करता आल्या. अशाप्रकारे हैदराबादने 110 धावांनी मोठा विजय मिळवला.

सामन्यानंतर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) म्हणाला, “हैदराबादने जबरदस्त फलंदाजी केली. आमच्या गोलंदाजांकडून काही चुकाही झाल्या, ज्याचा त्यांनी पुरेपूर फायदा घेतला. वाईट चेंडूंना तर त्यांनी फटके दिलेच, पण चांगल्या चेंडूंवरही ते तितक्याच आत्मविश्वासाने खेळले. त्यांच्या फलंदाजीत स्पष्ट उद्देश दिसत होता. आमच्याकडे विविध डावपेच होते, पण ते नीट अंमलात आणण्यात थोडं कमी पडलो. क्लासेनसारखा फलंदाज अशा वेळी पूर्णपणे हावी होतो.” (Ajinkya Rahane Reaction vs SRH Match loss)

त्यानंतर रहाणेने संघाच्या कामगिरीबाबतही मत मांडले, Ajinkya Rahane Reaction On KKR Team “माझ्या मते, या मोसमात काही चांगले क्षण होते, पण काही सामने असे होते जिथे आम्ही संघ म्हणून अपयशी ठरलो. आमच्याकडून काही चुका झाल्या, विशेषतः गोलंदाजीत, पण संपूर्ण संघाने मेहनत केली. आयपीएल ही एक अत्यंत स्पर्धात्मक लीग आहे, इथे सतत सज्ज राहावं लागतं. काही संधी निसटल्या, पण प्रत्येक क्षणातून काही ना काही शिकायला मिळालं. पुढच्या हंगामात त्या शिकवणींचा उपयोग करून आम्ही अधिक भक्कम पुनरागमन करू.”

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---