आयपीएल 2025चा तेरावा सामना लखनऊ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यात रंगला. हा सामना लखनऊच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना एलएसजीने पंजाबला 172 धावांचे लक्ष्य दिले आहे. प्रत्युत्तरात, पंजाब किंग्जने हे लक्ष्य 16.2 षटकांत 8 विकेट्स राखून पूर्ण केले.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या लखनऊ संघाची सुरुवात खराब झाली. मिचेल मार्श पहिल्याच षटकात खाते न उघडता बाद झाला. सुरुवातीची विकेट गमावल्यानंतर, एडेन मार्करामने निकोलस पूरनसह दुसऱ्या विकेटसाठी 31 धावांची भागीदारी केली. मार्करामने 18 चेंडूत 28 धावा केल्या, दरम्यान त्याने चार चौकार आणि एक षटकार मारला. या सामन्यातही कर्णधार रिषभ पंतचा (2) फ्लॉप शो सुरूच राहिला.
सामन्यातील टॉप ऑर्डर लवकर गडगडल्यावर, निकोलस पूरनने आयुष बदोनीच्या साथीने डाव सावरला. चौथ्या विकेटसाठी दोघांनी मिळून 54 महत्वपूर्ण धावा जोडल्या. पूरनने आक्रमक खेळी केली, पण त्याचे अर्धशतक अवघ्या काही धावांनी हुकले. तो 44 धावांवर बाद झाला आणि त्याची विकेटच सामना फिरवणारा क्षण ठरली.
Outfoxing his opponent, ft. Yuzvendra Chahal ????#TATAIPL's leading wicket-taker gets the HUGE scalp of Nicholas Pooran ????#LSGvPBKS | @PunjabKingsIPL | @yuzi_chahal pic.twitter.com/WGgc84j0rC
— IndianPremierLeague (@IPL) April 1, 2025
बदोनीने डेव्हिड मिलर (18) सोबत 30 धावांची महत्त्वाची भागीदारी रचली. त्यानंतर, त्याने अब्दुल समदच्या साथीने सहाव्या विकेटसाठी 47 धावा जोडल्या, बदोनीने 33 चेंडूत 41 धावा फटकावत एक चौकार आणि तीन षटकार ठोकले. समदनेही केवळ 12 चेंडूत तडाखेबंद 27 धावा केल्या. मात्र, निकोलस पूरन लवकरच माघारी परतल्याने लखनऊ संघ 25-30 धावा कमी पडला आणि 20 षटकांत 172 धावांपर्यंतच मजल मारू शकला.






