आयपीएल 2025 मेगा लिलावाची तयारी सुरू झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच (BCCI) ने लिलाव केव्हा आणि कुठे होणार हे जाहीर केले आहे. हा मेगा लिलाव असल्याने तो दोन दिवस चालणार आहे. सौदी अरेबियातील जेद्दाह येथे 24 आणि 25 नोव्हेंबर असे दोन दिवस मेगा लिलाव होणार आहे. यामध्ये 1,574 खेळाडूंनी (1,165 भारतीय आणि 409 परदेशी) आपली नोंदणी केली आहे. परंतु प्रत्येकी 2 कोटी रुपयांच्या मूळ किंमतीत कोणते भारतीय खेळाडू असतील हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर या बातमीद्वारे या खेळाडूंबद्दल जाणून घेऊयात
मेगा लिलावासाठी डझनभर भारतीय खेळाडू आहेत. ज्यांची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिषभ पंत, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांची नावे त्यांच्यामध्ये शीर्षस्थानी आहेत. कारण या खेळाडूंनी गेल्या हंगामात कर्णधारपद भूषवले होते. परंतु यावेळी त्यांना अनुक्रमे दिल्ली कॅपिटल्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्सने कायम ठेवले नाही. याशिवाय आर अश्विन आणि युझवेंद्र चहल देखील प्रत्येकी 2 कोटी रुपयांच्या मूळ किमतीने मेगा लिलावात उतरतील. या खेळाडूंना राजस्थान रॉयल्सने कायम ठेवलेले नाही.
टीम इंडियासाठी शेवटच्या सामन्यात विश्वचषक 2023 चा अंतिम सामना खेळणाऱ्या मोहम्मद शमीची मूळ किंमत देखील 2 कोटी रुपये असेल. त्याच्या चांगल्या कामगिरीनंतर त्याला गुजरात टायटन्सने कायम ठेवले नाही. त्याच्याशिवाय खलील अहमद, दीपक चहर, व्यंकटेश अय्यर, आवेश खान, ईशान किशन, मुकेश कुमार, भुवनेश्वर कुमार, प्रसीद कृष्णा, टी नटराजन, देवदत्त पडिक्कल, क्रुणाल पांड्या, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव यांचा समावेश आहे.गेल्या लिलावात न विकलेले राहिलेले पृथ्वी शॉ आणि सरफराज यांनी प्रत्येकी 75 लाख रुपयांच्या मूळ किमतीवर नोंदणी केली आहे.
आयपीएल रिटेन्शनपूर्वी, प्रत्येक संघाकडे त्यांची टीम तयार करण्यासाठी एकूण 120 कोटी रुपये होते. परंतु कायम ठेवल्यानंतर, पंजाब किंग्सकडे मेगा लिलावात खर्च करण्यासाठी सर्वात मोठी पर्स (110.5 कोटी रुपये) शिल्लक आहेत. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (रु. 83 कोटी), दिल्ली कॅपिटल्स (रु. 73 कोटी), गुजरात टायटन्स (69 कोटी), लखनऊ सुपर जायंट्स (रु. 69 कोटी), चेन्नई सुपर किंग्स (55 कोटी), कोलकाता नाइट रायडर्स (रु. 51) कोटी), मुंबई इंडियन्स (रु. 45 कोटी), सनरायझर्स हैदराबाद (45 कोटी) आणि राजस्थान रॉयल्स (41 कोटी) सर्वात कमी पर्ससह.शेवटच्या स्थानी आहे.
हेही वाचा-
IPL; मेगा लिलावात भारतातील 1165 खेळाडूंची नोंदी; कॅप्ड खेळाडूंची संख्या जाणून व्हाल थक्क!
आयपीएल मेगा लिलावापूर्वीच श्रेयस अय्यरचा वाढला ‘भाव’, अनेक फ्रँचायझींकडून मिळतेय खास ऑफर
“तू नेहमीच माझा कर्णधार…” श्रेयस अय्यर नाही, तर शाहरूख खानला आठवतोय ‘हा’ दिग्गज