आयपीएल फ्रँचायझी पंजाब किंग्जच्या (पीबीकेएस) मालकांमध्ये मतभेद झाले आहेत. सह-मालकांमधील शेअर्सबाबतचा वाद झाला आहे. आयपीएल 2025 मेगा लिलावापूर्वी, पंजाब किंग्ज सह-मालक आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने या संदर्भात पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. प्रीतीने सहमालक आणि प्रवर्तक मोहित बर्मन याच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत प्रीतीने मोहितला आयपीएल फ्रँचायझीमधील शेअर्सचा काही भाग इतर कोणत्याही पक्षाला विकण्यापासून रोखण्याची विनंती केली आहे. या प्रकरणाची सुनावणी 20 ऑगस्ट रोजी होणार आहे.
पंजाब किंग्ज संघात मोहित बर्मन आणि प्रीती झिंटाचे सर्वाधिक वाटा आहेत. बर्मन यांच्याकडे टीमचे 48% शेअर्स आहेत, तर बॉलीवूड अभिनेत्रीकडे 23% शेअर्स आहेत. प्रीती झिंटाने आरोप केला आहे की बर्मन यांनी मालकांमधील अंतर्गत करार न पाळता त्यांचे 11.5% शेअर्स विकण्याचा प्रयत्न केला आहे. या कराराच्या अटींनुसार, भागधारकांना त्यांचे समभाग विकण्यापूर्वी विद्यमान प्रवर्तकांना ते विकत घेण्यास सांगणे बंधनकारक आहे. वास्तविक, बर्मन हे आयुर्वेदिक आणि एफएमसीजी (FMCG) कंपनी डाबरचे अध्यक्ष आहेत. तो कॅरिबियन प्रीमियर लीग (CPL) फ्रेंचायझी सेंट लुसिया किंग्सचा संचालक आणि सह-मालक देखील आहे.
Preity Zinta filed a case on Mohit Burman because he was selling his shares to an unnamed party💀
— Manya 🙂 (@maannyaaa) August 16, 2024
दुसरीकडे, बर्मन यांनी क्रिकबझला दिलेल्या निवेदनात सांगितले की त्यांनी कधीही त्यांचे शेअर्स विकण्याचा विचार केला नाही. तथापि, बर्मन यांना त्यांचे 11.5% शेअर्स एका अज्ञात पक्षाला विकायचे आहेत असे अहवालातून समोर आले आहे.
या प्रकरणाबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही, मात्र या प्रकरणाची सुनावणी 20 ऑगस्ट रोजी होणार आहे. पंजाब फ्रँचायझीची आतापर्यंतची कामगिरी निराशाजनक आहे. आयपीएलच्या 17 वर्षांच्या इतिहासात पंजाबचा संघ केवळ एकदाच अंतिम फेरीत पोहोचला आहे, जिथे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
हेही वाचा-
ईशान किशन करणार टीम इंडियात पुनरागमन! जय शहांनी दिली तिखट प्रतिक्रिया
मुंबईच्या रस्त्यावर लॅम्बोर्गिनीत फिरताना दिसला रोहित, कारचा क्रमांक जिंकतोय चाहत्यांची मने
श्रीलंकन क्रिकेटर अडकला डोपिंगमध्ये, बोर्डाने अनिश्चित काळासाठी केले निलंबित