---Advertisement---

आयपीएलच्या मेगा लिलावात उतरणार 1500 पेक्षा जास्त खेळाडू, तारिख आणि ठिकाणही समोर

ipl-auctions
---Advertisement---

अलीकडेच सर्व 10 फ्रँचायझींनी इंडियन प्रीमियर लीग 2025 साठी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली होती. यानंतर आता मेगा लिलावाबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. आयपीएल 2025 पूर्वी, जेद्दाह, सौदी अरेबिया येथे मेगा लिलाव होणार आहे.
हा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

आयपीएलने मंगळवारी (05 नोव्हेंबर) सोशल मीडियाद्वारे मेगा लिलावाची माहिती दिली. त्यानुसार आयपीएलसाठी खेळाडूंची नोंदणी अधिकृतपणे 4 नोव्हेंबर 2024 रोजी बंद झाली. एकूण 1,574 खेळाडूंनी (1,165 भारतीय आणि 409 परदेशी) मेगा टाटा आयपीएल 2025 च्या लिलावाचा भाग होण्यासाठी नोंदणी केली. हा लिलाव येत्या 24 आणि 25 नोव्हेंबरला होणार आहे. हा लिलाव सौदी अरेबियातील जेद्दाह येथे होणार आहे. या यादीत 320 कॅप्ड खेळाडू, 1,224 अनकॅप्ड खेळाडू आणि असोसिएट नेशन्समधील 30 खेळाडूंचा समावेश आहे. सर्व संघांमध्ये जास्तीत जास्त 204 खेळाडूंची जागा आहे. अशा परिस्थितीत जास्तीत जास्त 204 खेळाडूच विकले जातील.

अनेक प्रसिद्ध खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे
सर्व 10 आयपीएल संघांनी 31 ऑक्टोबर रोजी आपापल्या रिटेंशन याद्या जाहीर केल्या होत्या. मेगा लिलावापूर्वी एकूण 46 खेळाडूंना कायम ठेवण्यात आले होते, ज्यावर एकूण 558.5 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. राखून ठेवलेल्या खेळाडूंमध्ये हेन्रिक क्लासेन सर्वात महागडा ठरला, त्याला सनरायझर्स हैदराबादने 23 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले. दुसरीकडे, विराट कोहली आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक रकमेसाठी कायम ठेवणारा खेळाडू ठरला आहे. त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) 21 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे.

राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघांनी सर्व 6 खेळाडूंना कायम ठेवले आहे. या संघांना यापुढे लिलावात राईट टू मॅच कार्ड खेळता येणार नाही. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, लखनऊ सुपर जायंट्स, सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांनी प्रत्येकी पाच खेळाडूंना कायम ठेवले आहे, त्यामुळे या संघांना कोणत्याही एका खेळाडूला राईट टू मॅच कार्ड वापरण्याची परवानगी असेल. दरम्यान, पंजाब किंग्जने केवळ 2 खेळाडूंना रिटेन करून सर्वांना चकित केले होते. रिषभ पंत, जोस बटलर, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर सारखे प्रसिद्ध खेळाडू मेगा लिलावात सहभागी होणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

“तो जागतिक दर्जाचा खेळाडू पण…”, ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचे केएल राहुलला चँलेज

विराट आणि बाबर एकाच संघातून खेळणार, 17 वर्षांनंतर पुन्हा योगायोग जुळून येणार?
रोहित शर्माने कसोटीतून निवृत्ती घ्यावी, माजी दिग्गजाचे खळबळजनक वक्तव्य!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---