न्यूझीलंडकडून मायदेशात झालेल्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीपचा लाजिरवाणा सामना केल्यानंतर भारतीय संघ सर्वांच्याच निशाण्यावर आहे. सध्याचा भारतीय संघही गेल्या काही वर्षांतील सर्वात कमकुवत भारतीय संघ असल्याचे दिसते. अशा परिस्थितीत त्याला आता ऑस्ट्रेलियाचा दौरा करावा लागणार आहे, जे मोठे आव्हान ठरणार आहे. भारतीय संघ या मालिकेसाठी रवानाही झालेली नाही. मात्र, ऑस्ट्रेलियाकडून एका खेळाडूला आधीच लक्ष्य केले जाऊ लागले आहे. हा खेळाडू विराट कोहली, रोहित शर्मा, रिषभ पंत किंवा यशस्वी जयस्वाल नाहीत तर तो केएल राहुल आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका 22 नोव्हेंबरपासून पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर सुरू होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ 10 आणि 11 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. मात्र, मालिका सुरू होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज स्कॉट बोलंडने भारतीय फलंदाज केएल राहुलवर शाब्दिक हल्ले सुरू केले आहेत. याचे कारण म्हणजे भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील सामना. ज्यामध्ये हे दोन खेळाडू एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.
न्यूझीलंडविरुद्धची मालिका गमावल्यानंतर, बीसीसीआयने ताबडतोब केएल राहुल आणि ध्रुव जुरेलला ऑस्ट्रेलियाला पाठवण्याचा निर्णय घेतला. जिथे हे दोन्ही खेळाडू भारत अ संघात सामील होतील आणि 7 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यात खेळतील.
ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज बोलंड देखील या सामन्यात उतरणार आहे. त्यामुळे त्याने थेट राहुलला इशाराच दिला आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणाऱ्या या सामन्यापूर्वी बोलंडने सांगितले की, “राहुलविरुद्ध त्या मैदानात खेळण्याची मजाच वेगळी असेल. तो जागतिक दर्जाचा खेळाडू आहे. मात्र, मला वाटते की तो एक फलंदाज आहे ज्याच्याविरुद्ध मला डावाच्या सुरुवातीला वर्चस्व गाजवण्याची संधी मिळेल. आशा आहे की, आगामी सामन्यांमध्ये मी त्याच्यावर विजय मिळवेन.” न्यूझीलंडविरुद्धच्या बंगळुरू कसोटीत शून्य आणि 12 धावांनंतर राहुलला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आलेले.
महत्त्वाच्या बातम्या-
विराट आणि बाबर एकाच संघातून खेळणार, 17 वर्षांनंतर पुन्हा योगायोग जुळून येणार?
रोहित शर्माने कसोटीतून निवृत्ती घ्यावी, माजी दिग्गजाचे खळबळजनक वक्तव्य!
IPL 2025; संघाने रिलीज केल्यानंतर ‘या’ स्टार खेळाडूने अनफाॅलो करत फोटोही केले डिलीट