---Advertisement---

MI vs DC: ‘या’ खेळाडूसमोर दिल्ली कॅपिटल्सचा डाव कोलमडला; मुंबई विजयी ट्रॅकवर

---Advertisement---

आयपीएल 2025 च्या 29 व्या सामन्यात चुरशीचा थरार अनुभवायला मिळाला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 12 धावांनी पराभव करत हंगामातील आपला दुसरा विजय मिळवला. या विजयात मुंबईच्या अनुभवी फिरकीपटू कर्ण शर्माने निर्णायक भूमिका बजावत सामना फिरवला. शानदार कामगिरीमुळे त्याने सामनावीर पुरस्कार पटकावला.

पहिल्या डावात खेळताना मुंबई इंडियन्सने मर्यादित 20 षटकात 205 धावा केल्या, ज्यात तिलक वर्माने 59 धावांची खेळी खेळली. प्रत्युत्तरात दिल्लीसाठी जेक फ्रेझर-मॅकगर्क आणि अभिषेक पोरेल यांनी सलामी केली. दिल्लीला पहिल्याच षटकात धक्का बसला, दिपक चहरने जेक फ्रेझर-मॅकगर्कला शून्यावर बाद केले. त्यानंतर मात्र करुण नायरच्या आक्रमक फलंदाजीमुळे दिल्लीला विजय अगदी सहज मिळेल असे वाटत असतानाच, कर्ण शर्माने अभिषेक पोरेल (33) ट्रिस्टन स्टब्स (1) आणि के.एल. राहुल (15) यांना झटपट बाद करत सामन्याचा रोख बदलून टाकला. त्याच्या या तीन विकेट्समुळे दिल्लीचा डाव कोलमडला. अशाप्रकारे दिल्लीच्या खिश्यातील सामना मुंबईने पळवला. सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून करुण नायरने शानदार फलंदाजी केली. त्याने 40 चेंडूत 89 धावा केल्या.

या विजयामुळे पाच वेळा आयपीएल जिंकलेल्या मुंबई इंडियन्सचा आत्मविश्वास उंचावला असून, संघाचा फॉर्म पुन्हा ट्रॅकवर येण्याची चिन्हं आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---