---Advertisement---

किंग तो किंगच! बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर षटकार, VIDEO VIRAL

On: मंगळवार, एप्रिल 8, 2025 8:19 AM
---Advertisement---

आयपीएल 2025 मधील 20वा सामना काल मुंबई इंडियन्स विरुद्ध राॅयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळला गेला. हा सामना आरसीबीने 12 धावांनी जिंकला. सामन्यात टाॅस गमावून पहिल्या डावात खेळताना आरसीबीने 20 षटकात 221 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सला केवळ 9 गडी गमावून 209 धावा केल्या. आशाप्रकारे 10 वर्षांनी बंगळुरुने मुंबई इंडियन्सला मुंबईमध्ये हरवले. आरसीबीच्या विजयात विराट कोहलीने मोलाची भूमिका बजावली. त्याने 42 चेंडूत 67 धावा केल्या. त्याच्या विस्फोटक खेळीने संघ 200+ धावा करण्यात यशस्वी ठरला.

दरम्यान या सामन्यातून जसप्रीत बुमराहने आयपीएल 2025 मध्ये कमबॅक केला. जसप्रीत बुमराह दुखापतीतून सावरून यंदाच्या पर्वातील पहिलाच सामना खेळायला मैदानावर उतरला. सामन्याच्या तिसऱ्या षटकात कोहली व पडिक्कल यांनी 16 धावा चोपल्यानंतर गोलंदाजील बदल केला गेला. यानंतर बुमराहला गोलंदाजीला आणले गेले आणि पडिक्कलने एक धाव घेत कोहलीला स्ट्राईक दिली. त्यानंतर कोहलीने बुमराहला अनपेक्षित षटकार खेचला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडिओ-

या षटकारासोबतच कोहलीने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. टी-20 क्रिकेटमध्ये 13000 धावांचा टप्पा ओलांडणारा कोहली पाचवा फलंदाज ठरला. पण, भारतात असा पराक्रम करणारा तो एकमेव फलंदाज आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---