---Advertisement---

कोण राहाणार नंबर 1 आणि 2 वर? पहा आयपीएलची प्ले-ऑफ समीकरणं?

On: सोमवार, मे 26, 2025 12:14 PM
---Advertisement---

आयपीएल 2025 च्या प्लेऑफसाठी गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स हे चार संघ पात्र ठरले आहेत. मात्र या चारही संघांपैकी अद्याप कोणताही संघ गुणतालिकेच्या अव्वल दोन स्थानांवर आपले स्थान निश्चित करू शकलेला नाही. त्यामुळे टॉप 2 साठीची शर्यत अधिकच रंगतदार झाली आहे. IPL 2025: Playoffs race

टाॅप-2 चे महत्त्व काय?

जो संघ पहिला किंवा दुसरा क्रमांक पटकावतो, ते एकमेकांविरुद्ध क्वालिफायर 1 मध्ये खेळतात या सामन्याचा विजेता थेट फायनलमध्ये जातो, तर पराभूत संघाला अजून एक संधी मिळते. तो संघ क्वालिफायर 2 मध्ये एलिमिनेटर विजेत्या संघाशी खेळतो. IPL 2025: Top 2 qualification

सध्या गुजरात टायटन्स 18 गुणांसह पहिल्या क्रमांकावर असले तरी त्यांचे सर्व लीग सामने पूर्ण झाले आहेत. अखेरच्या दोन सामन्यांत त्यांना पराभव स्विकारावा लागला असून, त्यामुळे त्यांचे पहिले स्थान आता निश्चित राहणार नाही. सोमवार, 26 मे रोजी जयपूरमध्ये होणाऱ्या पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या सामन्याचा थेट परिणाम टॉप 2 वर होणार आहे. या सामन्याचा विजेता गुजरातला मागे टाकून अव्वल स्थानावर जाईल, तर पराभूत संघ टॉप 2 च्या शर्यतीतून बाहेर पडेल. Top of the table clash

पंजाब किंग्ज सध्या 17 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर असून, जर त्यांनी मुंबईवर विजय मिळवला, तर त्यांचे टॉप 2 मधील स्थान निश्चित होईल. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सचे 16 गुण असून, त्यांनी हा सामना जिंकला, तर ते 18 गुणांसह नेट रनरेटच्या जोरावर थेट टॉपवर जाऊ शकतात. मात्र, त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू जर आपला सामना जिंकले, तर ते मुंबईला मागे टाकून अव्वल स्थान पटकावतील. Playoff scenarios

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा सामना मंगळवारी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध आहे. आरसीबी सध्या 17 गुणांसह तिसऱ्या स्थानावर असून, त्यांना टॉप 2 मध्ये जाण्यासाठी विजय अनिवार्य आहे. जर पंजाबने मुंबईला हरवले, तर आरसीबीला पहिल्या क्रमांकासाठी मोठ्या फरकाने सामना जिंकावा लागेल. परंतु, जर मुंबईने पंजाबला हरवले, तर आरसीबी कोणत्याही फरकाने सामना जिंकून अव्वल स्थानी पोहोचू शकतात. आरसीबीचा पराभव झाल्यास, त्यांचे स्थान एलिमिनेटरमध्ये म्हणजेच 3 किंवा 4 व्या क्रमांकावर निश्चित होईल.

सध्या परिस्थिती अत्यंत चुरशीची असून, गुजरात टायटन्सचे टॉप 2 मधील स्थान आता इतर सामन्यांच्या निकालांवर अवलंबून आहे. आयपीएलच्या लीग टप्प्यातील शेवटचे दोन दिवस हा नाट्यमय थरार चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे. IPL 2025 thriller

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---