---Advertisement---

नाद रेकाॅर्ड! आरसीबीची वादळी कामगिरी! IPLमध्ये बंगळुरुने रचला नवा इतिहास

---Advertisement---

आयपीएल 2025 च्या 20 व्या सामन्यात वानखेडेवर प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 221 धावा केल्या, ज्यामध्ये विराट कोहली (67) आणि रजत पाटीदार (64) यांनी प्रभावी अर्धशतके झळकावली. प्रत्युत्तरात, मुंबई इंडियन्स फक्त 209 धावाच करू शकले, ज्याचे श्रेय शेवटच्या 2 षटकात गोलंदाजी करणाऱ्या जोश हेझलवूड आणि कृणाल पांड्या यांनाही जाते. या विजयासह, आरसीबीने आयपीएलमध्ये इतिहास रचला आणि एकाच हंगामात सीएसके, मुंबई आणि केकेआरला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करणारा दुसरा संघ बनला आहे.

मुंबई इंडियन्सला विजयासाठी 12 चेंडूत 28 धावांची आवश्यकता होती. हार्दिक पांड्या आणि नमन धीर फलंदाजी करत होते, येथून मुंबईचा विजय सोपा दिसत होता पण जोश हेझलवूडने 19 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिकला बाद करून सामना उलटला. या षटकात त्याने फक्त 9 धावा दिल्या. शेवटच्या षटकात 19 धावांची आवश्यकता होती आणि कर्णधाराने चेंडू फिरकी गोलंदाज कृणाल पांड्याकडे सोपवला, त्यानेही निराश केले नाही आणि षटकातील पहिल्या 2 चेंडूत 2 बळी घेत सामना ताब्यात घेतला. त्याने पहिल्या चेंडूवर सँटरनरला आणि दुसऱ्या चेंडूवर दीपक चहरला बाद केले. या षटकात कृणालने नमन धीरलाही बाद केले आणि आरसीबीने 12 धावांनी सामना जिंकला.

आयपीएलच्या इतिहासात एकाच हंगामात वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्जला चेपॉकवर आणि कोलकाता नाईट रायडर्सला ईडन गार्डन्सवर हरवणारा आरसीबी हा दुसरा संघ ठरला. म्हणजेच एकाच हंगामात तिन्ही मोठ्या संघांना त्यांच्या घरच्या मैदानावर हरवणारा आरसीबी दुसरा संघ बनला आहे. यापूर्वी 2012 मध्ये पंजाब किंग्जने ही कामगिरी केली होती.

रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली, आरसीबीने हंगामाची सुरुवात केकेआरवर विजय मिळवून केली. ईडन गार्डन्स स्टेडियमवर झालेल्या पहिल्या सामन्यात त्यांनी केकेआरचा 7 गडी राखून पराभव केला होता. दुसऱ्या सामन्यात, चेपॉक स्टेडियमवर आरसीबीने चेन्नई सुपर किंग्जचा 50 धावांनी पराभव केला. तिसऱ्या सामन्यात गुजरातकडून पराभव पत्करल्यानंतर, संघाने वानखेडे स्टेडियमवर झालेल्या चौथ्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव केला. आयपीएलच्या इतिहासात एकाच हंगामात या संघांना त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करणारा हा दुसरा संघ ठरला आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---