आयपीएलच्या यंदाच्या हंगामाच्या 52व्या सामन्यात आरसीबीने चेन्नई सुपर किंग्जचा 2 धावांनी पराभव केला. या सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत कोणत्याही संघाचा विजय निश्चित वाटत नव्हता. पण शेवटी आरसीबीने विजय मिळवला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 213 धावा केल्या, ज्याच्या प्रत्युत्तरात सीएसके संघाला फक्त 211 धावा करता आल्या. आयपीएलच्या इतिहासात हे पहिलेच वेळा आहे की आरसीबीने लीग टप्प्यात चेन्नई सुपर किंग्जचा दोनदा पराभव केला आहे. यापूर्वी आयपीएलच्या लीग टप्प्यात ते असे करू शकले नव्हते. या सामन्यापूर्वी, चालू हंगामात आरसीबीने सीएसके विरुद्ध 50 धावांनी विजय मिळवला.
सामन्याची सुरुवात आरसीबीसाठी आशादायक ठरली. जेकब बेथेल (55) आणि विराट कोहली (62) यांनी पहिल्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी करत भक्कम पाया घातला. कोहलीने आपल्या 33 चेंडूंच्या खेळीत 5 चौकार व 5 षटकारांची आतषबाजी केली. त्यानंतर रोमारियो शेफर्डने शेवटच्या टप्प्यात फटकेबाजी करत केवळ 14 चेंडूत 53 धावा ठोकल्या आणि संघाला 213 पर्यंत नेलं.
CSKकडून मथिशा पथिरानाने सर्वाधिक प्रभावी गोलंदाजी केली. त्याने 4 षटकांत 36 धावा देत तीन बळी घेतले. मात्र, इतर गोलंदाजांची कामगिरी निराशाजनक ठरली. खलील अहमदने आपल्या 3 षटकांत तब्बल 65 धावा दिल्या.
214 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात खराब झाली. शेख रशीद (14) आणि सॅम करन (5) लवकर बाद झाले. पण त्यानंतर युवा आयुष महात्रे आणि अनुभवी रवींद्र जडेजाने डाव सावरला. महात्रेने आक्रमक फलंदाजी करत 48 चेंडूत 94 धावा केल्या, ज्यामध्ये 9 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. जडेजानेही 77 धावांची खेळी खेळली पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
मात्र, लुंगी एनगिडीने सामन्यात निर्णायक टप्प्यावर सलग दोन चेंडूंवर म्हात्रे आणि ब्रेव्हिसला बाद करत चेन्नईला मोठा धक्का दिला. शेवटच्या षटकात 15 धावांची गरज असताना यश दयालने अचूक मारा करत संघाला विजय मिळवून दिला. आरसीबीसाठी एन्गिडीने सामन्यात 3 बळी घेतले.
What winning an absolute thriller against your great rival feels like ????
— IndianPremierLeague (@IPL) May 3, 2025
???????????? ???????????????????????????????? from the #RCB camp ❤#TATAIPL | #RCBvCSK | @RCBTweets pic.twitter.com/hy1Y8tTxM2






