IPL 2025 मंगळवारी आयपीएल 2025 च्या शेवटच्या साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) लखनऊ सुपरजायंट्स (LSG) ला सहा विकेट्सनी पराभूत केले. LSG VS RCB लखनऊच्या एकाना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात, कर्णधार रिषभ पंतने लखनऊसाठी 118 धावांची शानदार खेळी खेळली, परंतु त्याची खेळी संघाला विजयाकडे नेऊ शकली नाही.
आरसीबीसाठी, कर्णधार जितेश शर्माने अखेर 33 चेंडूत 85 धावा करून सामन्याचे चित्रच पालटले. त्याने सहा षटकार आणि आठ चौकार मारले. लखनऊच्या 227/3 च्या प्रत्युत्तरात आरसीबीने 18.4 षटकात 230/4 धावा करून सामना जिंकला. आयपीएलच्या इतिहासातील हा तिसरा सर्वाधिक धावांचा पाठलाग आहे. Jitesh Sharma Match Winning Performance
228 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने दमदार सुरुवात केली. फिलिप सॉल्टने 30 धावा तर विराट कोहलीने 54 धावांची महत्वपूर्ण खेळी खेळली. मात्र मधल्या षटकात लखनऊ सुपर जायंट्सने सामन्यात पुनरागमन केले. त्यांनी रजत पाटीदार (14) आणि लियाम लिव्हिंगस्टोन (0) यांना झटपट बाद करत आरसीबीला अडचणीत आणले.
त्यानंतर मयंक अग्रवाल आणि जितेश शर्माने संघाची धुरा सांभाळत लक्षवेधी भागीदारी रचली. मयंकने 23 चेंडूत 41 धावा करत संयमी खेळी खेळली, तर दुसऱ्या बाजूने जितेश शर्माने आक्रमक शैलीत फलंदाजी करत 33 चेंडूत नाबाद 85 धावा ठोकल्या.
???????????????????? ???????????????????????? ????
— IndianPremierLeague (@IPL) May 27, 2025
An absolute masterclass ????#RCB fans, a word for your captain ????
Updates ▶ https://t.co/h5KnqyuYZE #TATAIPL | #LSGvRCB | @RCBTweets pic.twitter.com/Z4GN9RoRKB
जितेश शर्माची ही खेळी सामना फिरवणारी ठरली. त्याने 8 चौकार-6 षटकारांचा वर्षाव करत एलएसजीच्या गोलंदाजांवर दडपण टाकलं. त्याच्या आक्रमक फटकेबाजीमुळे आरसीबीने 8 चेंडू राखून विजय मिळवला.






