आयपीएल 2025च्या हंगामाचं बिगुल वाजलं आहे. स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. आयपीएल 2025च्या सलामी सामन्यात केकेआर आणि आरसीबी आमने सामने आहेत. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच केकेआर पहिल्या डावात फलंदाजी करताना दिसणार आहे.
दोन्ही संघ तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकीपटूंसह मैदनात उतरली आहे. पाहा दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन –
राॅयल चॅलेंजर्स बेंगळुरु : विराट कोहली, फिलिप साल्ट (विकेटकीपर), रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, रसिक दार सलाम, सुयश शर्मा, जोश हेझलवूड, यश दयाल
कोलकाता नाईट रायडर्स : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, अंगकृष रघुवंशी, सुनील नारायण, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती
दोन्ही संघाच्या हेड टू हेड रेकाॅर्डबद्दल बोलायचे झाल्यास, आतापर्यंत यासंघांमध्ये 34 सामने खेळल्या गेल्या आहेत. ज्यात केकेआरने 20 तर आरसीबीने 14 सामने जिंकल्या आहेत. आकडेवारीनुसार तर केकेआरचं पारडं जड आहे. पण क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल ते सांगता येत नाही.