आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी खेळाडूंना रिटेन करण्याच्या नियमांमध्ये थोडा बदल करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) नुकतेच आयपीएल 2025 साठी रिटेन्शनचे नियम जाहीर केले होते. यामध्ये आता थोडा बदल करण्यात आला आहे. हे अधिकृतपणे झालेलं नाही. ‘ईएसपीएन क्रिकइन्फो’च्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे.
अहवालानुसार, आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी संघ त्यांच्या पर्समधून रिटेन केलेल्या खेळाडूंना कितीही रक्कम देऊ शकतात. या रिपोर्टनुसार, सनरायझर्स हैदराबादनं स्फोटक फलंदाज हेनरिक क्लासेनला 18 कोटी नव्हे तर 23 कोटी रुपये देण्याचं मान्य केलं आहे. सनरायझर्स हैदराबाद हेनरिक क्लासेनला 23 कोटी, पॅट कमिन्सला 18 कोटी आणि अभिषेक शर्माला 14 कोटी रुपयांना रिटेन करू शकतात.
बीसीसीआयनं नियम जाहीर केले होते, तेव्हा खेळाडूंना रिटेन करण्यासाठी 18 कोटी, 14 कोटी, 11 कोटी, 18 कोटी आणि 14 कोटी रुपयांचा स्लॅब बनवला होता. तर अनकॅप्ड खेळाडूसाठी 4 कोटी रुपये निर्धारित करण्यात आले होते. परंतु आता बीसीसीआयनं म्हटलं आहे की, संघ पहिल्या 5 खेळाडूंसाठी 75 कोटी रुपये देऊ शकतात, ज्यामध्ये कोणत्याही खेळाडूला कितीही रक्कम देता येऊ शकते. सनरायझर्स हैदराबाद या तीन खेळाडूंशिवाय ट्रॅव्हिस हेड आणि नितीश रेड्डी यांना रिटेन करण्याची चर्चा सुरू आहे.
सनरायझर्स हैदराबादनं या 3 खेळाडूंवर 55 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा स्थितीत संघाच्या खिशात आणखी 20 कोटी रुपये शिल्लक राहतील. ते ट्रॅव्हिस हेड आणि नितीश रेड्डी यांना प्रत्येकी 10 कोटी रुपये देऊन कायम ठेवू शकतात. या अहवालात हे सांगण्यात आलं आहे की, संघ त्यांचे 75 कोटी रुपये कसेही खर्च करू शकतात. बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे की, जर तुम्ही 5 कॅप्ड रिटेन्शन घेतले तर तुमच्या एकूण 120 कोटी रुपयांच्या पर्समधून 75 कोटी रुपये कापले जातील. जर तुम्ही अनकॅप्ड खेळाडू निवडला तरी पर्समधून 79 कोटी रुपये कापले जातील. जर एखाद्या संघानं चार खेळाडूंना रिटेन केलं, तर त्यांच्या पर्समधून 64 कोटी रुपये कापले जातील.
हेही वाचा –
IND vs NZ; दुसऱ्या दिवशीही पाऊस घालणार खोळंबा? कसे असणार बेंगळुरूचे हवामान?
BAN vs SA; बांगलादेशच्या ‘या’ स्टार खेळाडूला शेवटचा सामना खेळण्याची संधी!
IND vs NZ; कोहलीच्या नेतृत्वाखालील ‘हा’ रेकाॅर्ड मोडणे रोहित शर्मासाठी कठीण!