---Advertisement---

IPL 2025: संजू सॅमसनला पुन्हा दुखापत, टूर्नामेंटमधून बाहेर जाण्याची शक्यता

On: गुरूवार, एप्रिल 17, 2025 9:13 AM
---Advertisement---

राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार संजू सॅमसन पुन्हा एकदा जखमी झाला आहे. आयपीएल 2025च्या 32व्या सामन्यात संजू मैदानावर फलंदाजीसाठी आला. पण दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 31 धावा काढल्यानंतर सॅमसन रिटायर हर्ट झाला. त्याला खूप वेदना होत होत्या. सॅमसनच्या दुखापतीबद्दल राजस्थान रॉयल्सकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

दिल्ली कॅपिटल्सने पहिले फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्ससमोर 189 धावांचं लक्ष्य ठेवलं. राजस्थानकडून संजू सॅमसन आणि यशस्वी जयस्वाल सलामीला आले. सहावं षटक सुरु असताना संजू फलंदाजी करत होता. दिल्लीकडून विप्राज निगम गोलंदाजी करत होता. त्या षटकात तिसऱ्या चेंडूवर संजूने एक मोठा शॉट मारला, चेंडू लॉन्ग ऑफ दिशेला गेला, पण त्यांनी धाव घेतली नाही. त्यानंतर लगेचच संजूला वेदना जाणवायला लागल्या.

राजस्थानचा फिजिओ लगेच मैदानात आला आणि संजूच्या पाठीमागच्या फासळ्या तपासल्या. ब्रेकमध्ये संजूने एक गोळी (टॅब्लेट)ही घेतली. पण दुखापत कमी झाली नाही, त्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं. संजूने या खेळीत 19 चेंडूत 31 धावा केल्या, ज्यात 2 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.

आयपीएलच्या सध्याच्या स्थितीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. दुखापतीतून बरे झाल्यानंतर सॅमसन नुकताच पुनरागमन केला होता. त्याच्या अंगठ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. आता तो पुन्हा जखमी झाला आहे. जर संजूची दुखापत गंभीर नसेल तर तो लवकरच मैदानात परतू शकतो. पण जर गंभीर दुखापत झाली तर तो या हंगामातून बाहेर पडू शकतो.

दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना 188 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल, राजस्थान रॉयल्सने 20 षटकांत 188 धावा केल्या आहेत. यानंतर सुपर ओव्हर झाला. यामध्ये दिल्लीने राजस्थानचा पराभव केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---