---Advertisement---

SRH vs GT: ‘हा’ ठरला गुजरातच्या विजयाचा टर्निंग पाँईंट

---Advertisement---

आयपीएल 2025 च्या 19 व्या सामन्यात गुजरात टायटन्सचा संघ विजय मिळवण्यात यशस्वी झाला. कर्णधार शुबमन गिलच्या अर्धशतकाच्या आणि मोहम्मद सिराजच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर गुजरातने सनरायझर्स हैदराबादचा 7 विकेट्सने पराभव केला. यासह, गुजरात संघाने विजयाची हॅट्ट्रिक साधली. दुसरीकडे, हैदराबाद संघाला सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादला 20 षटकांत 8 गडी गमावून फक्त 152 धावा करता आल्या. गुजरातकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 17 धावा देत 4 बळी घेतले. सिराजने आयपीएलमध्ये त्याची सर्वोत्तम कामगिरी केली.

सनरायझर्सने दिलेल्या 152 धावांच्या धावसंख्येचा पाठलाग करताना गुजरातच्या डावाची सुरुवात खूपच खराब झाली. साई सुदर्शन तिसऱ्या षटकात 5 धावा काढून बाद झाला. नंतर, जोस बटलरही चौथ्या षटकात स्वस्तात बाद झाला. यादरम्यान, कर्णधार शुबमन गिलने जबाबदारी स्वीकारली आणि वॉशिंग्टन सुंदरसह 13 षटकांत संघाचा धावसंख्या 100 धावांच्या पुढे नेला. त्याच षटकात गिलने 36 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

गिलची आयपीएल इतिहासतील धावांचा पाठलाग करताना आलेली ही सर्वोत्तम खेळीपैकी एक आहे. संघावर दबाव असताना त्याने चमकदार कामगिरी केली. त्याला वाॅशिंग्टन सुंदरने चांगली साथ दिली. सुंदरला देखील त्याचे अर्धशतक पूर्ण करण्याची संधी होती पण शमीने त्याला पहिल्याच चेंडूवर बाद केले. सुंदर त्याच्या अर्धशतकापासून एक धाव कमी राहिला. त्याने 29 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांसह 49 धावांची खेळी केली. गिल आणि सुंदर यांनी तिसऱ्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी केली. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर आलेल्या शेरफेन रदरफोर्डने 16 चेंडूत 35*धावांची खेळी करत संघाला 16.4 षटकांत विजय मिळवून दिला. गिल आखेरपर्यंत (61*) नाबाद राहिला.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---