---Advertisement---

ईशान किशनची स्फोटक खेळी! IPL 2025 मधील पहिले शतक झळकावले

---Advertisement---

आज राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज ईशान किशनने शतक झळकावले. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ईशान किशनने 25 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले, त्यानंतर त्याने आक्रमक फलंदाजी करत 45 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात ईशान किशनला सनरायझर्स हैदराबादने 11.25 कोटी रुपयांना खरेदी केले.

सनरायझर्स हैदराबादचे सर्व फलंदाज स्फोटक फलंदाजी करताना दिसले. अभिषेक शर्माने 11 चेंडूत 24 धावा, ट्रॅव्हिस हेडने 31 चेंडूत 67 धावा आणि नितीश कुमारने 15 चेंडूत 30 धावा केल्या. शेवटी ईशान किशन 47 चेंडूत 106 धावा करून नाबाद परतला. त्याने त्याच्या डावात 11 चौकार आणि 6 षटकार मारले. यापूर्वी, आयपीएल 2025 च्या आधी मुंबई इंडियन्सने किशनला रिलीज केले होते.

राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सनरायझर्स हैदराबादने अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी 45 धावांची दमदार भागीदारी करत सुरुवात केली. चौथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अभिषेक शर्माला बाद करून महिश थीक्षशनाने हैदराबादला पहिला धक्का दिला. हैदराबादची दुसरी विकेट ट्रॅव्हिस हेडच्या रूपाने पडली.

ट्रॅव्हिस हेडने 31 चेंडूत नऊ चौकार आणि तीन षटकारांसह 67 धावा केल्या. नंतर, नितीश कुमार रेड्डी 15 चेंडूत 30 धावा आणइ हेनरिक क्लासेन 14 चेंडूत 34 धावा काढून बाद झाले. शेवटच्या षटकात अनिकेत वर्मा (07) आणि अभिनव मनोहर (शून्य) यांना तुषार देशपांडेने बाद केले. सनरायझर्स हैदराबादने निर्धारित 20 षटकांत सहा गडी गमावून 286 धावा केल्या. ईशान किशनने 47 चेंडूत 11 चौकार आणि सहा षटकारांसह नाबाद 106 धावांची तुफानी खेळी खेळली.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---