आयपीएल 2025चा दुसरा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात राॅयल्सचा कर्णधार रियान परागने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर पहिल्या डावात हैदराबाद संघ फलंदाजी करताना दिसेल.
पाहा दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन-
राजस्थान- यशस्वी जयस्वाल, शुभम दुबे, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), शिमरन हेटमायर, जोफ्रा आर्चर, महेश थिक्षाना, तुषार देशपांडे, संदीप शर्मा, फजलहक फारुकी
हैदराबाद- ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), सिमरजीत सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद शमी
हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमबद्दल बोलायचे झाले तर, याठिकाणी आतापर्यंत 77 आयपीएल सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 34 सामने जिंकले आहेत आणि धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने 42 सामने जिंकले आहेत.
या ठिकाणी पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 163 आहे. तथापि, येथे वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व दिसून येते, कारण 70.58 टक्के बळी वेगवान गोलंदाजांना मिळतात, तर फिरकी गोलंदाजांना फक्त 29.42 टक्के बळी मिळतात. यावरून असा अंदाज लावता येतो की येथे वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व असेल. त्यामुळे सहसा संघ नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतात






