---Advertisement---

IPL 2025 Final: आमिर खानची खास कॉमेंट्री, ‘या’ दोन खेळाडूंना दिला ‘परफेक्शनिस्ट’चा किताब

On: मंगळवार, जून 3, 2025 10:31 PM
---Advertisement---

आयपीएल 2025चा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला जात आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू फलंदाजी करत असताना, अभिनेता आमिर खान कमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित होता. या मनोरंजक सामन्यादरम्यान त्याने त्याच्या आगामी ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाचे प्रमोशन केले आणि थेट हिंदी आणि भोजपुरी कॉमेंट्रीचा भाग बनला.

प्रमोशन दरम्यान, जेव्हा आमिर खानला विचारले गेले की क्रिकेटच्या जगात कोणत्या खेळाडूला ‘सितारे जमीन पर’ म्हणजेच परफेक्शनिस्ट ही पदवी दिली जाऊ शकते, तेव्हा त्याने संकोच न करता सचिन तेंडुलकरचे नाव घेतले. आमिर म्हणाला, “आतापर्यंत मी सचिन तेंडुलकरला परफेक्शनिस्ट मानत होतो आणि आता मी विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना परफेक्शनिस्ट मानतो.”

सचिन तेंडुलकर 2013मध्ये निवृत्त झाला, परंतु क्रिकेटचा दिग्गज बनण्याची त्याची कहाणी अजूनही प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहे. दुसरीकडे, विराट कोहलीने सतत विक्रम मोडत महान खेळाडूंच्या यादीत स्वतःचा समावेश केला आहे. तर जसप्रीत बुमराहने आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होण्याचा विक्रम केला.

‘लाल सिंग चड्ढा’ नंतर आमिर खान पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतत आहे. ‘तारे जमीन पर’ हा त्याचा सुपरहिट चित्रपटचा सिक्वेल मानला जाणारा ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट 20 जून 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जेनेलिया डिसूझा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---