भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानबाबत (Zaheer Khan) मोठे अपडेट समोर आले आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, झहीर खान लखनऊ सुपर जायट्ंस (Lucknow Super Giants) संघाचा मेटाॅर होण्याची शक्यता दाट आहे. आज म्हणजेच (28 ऑगस्ट) बुधवार या संदर्भात आधिकृतरित्या घोषणा होण्याची शक्यता आहे. गाैतम गंभीरने लखनऊ संघ सोडल्यापासून संघात मेटाँरची जागा रिक्त आहे.
वास्तविक बोलायचे झाल्यास झहीर खान जर मेटाँर झाल्यास लखनऊ संघाला दुहेरी फायदा होऊ शकतो. मार्गदर्शकासह माजी भारतीय दिग्गज त्यांचा गोलंदाजीचा अनुभव संघाच्या गोलंदाजांसोबत शेअर करू शकतील. कारण मेटाँर पाठोपाठ संघात गोलंदाजी प्रशिक्षकाची देखील कमी आहे. याआधी मोर्ने माॅर्केल संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक होता. पण आता तो टीम इंडियासोबत जोडला गेला आहे.
लखनऊ सुपर जायट्ंसच्या सुत्रांनुसार आणि दैनिक जागरणच्या अहवालानुसार, आज (28 ऑगस्ट) कोणत्याही क्षणी लखनऊच्या मेटाँरपदाची घोषणा होण्याची शक्यता आहे. अनेक मीडिया अहवलात असाही दावा करण्यात आला आहे की, आज (28 ऑगस्ट) लखनऊ संघाच्या आधि्काऱ्यांची बैठक आहे. आश्या परिस्थिती आता झहीर खानबाबत किती दिवस किंवा कधी निर्णय घेतला जातो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
झहीर खान याआधी मुंबई इंडियन्सचे क्रिकेट संचालक होता. 2018 ते 2022 पर्यंत त्यांनी मुंबई इंडियन्समध्ये क्रिकेट संचालकपद भूषवले. याशिवाय माजी भारतीय गोलंदाज ग्लोबल क्रिकेट डेव्हलपमेंट प्रोग्रामचे प्रमुख देखील होता.
उल्लेखनीय आहे की झहीर खानने त्याच्या करिअरमध्ये 100 आयपीएल सामने खेळले. या सामन्यांच्या 99 डावांमध्ये गोलंदाजी करताना त्याने 27.27 च्या सरासरीने 102 विकेट घेतल्या. ज्यामध्ये त्याचे सर्वोत्तम 4/17 होते. या दरम्यान त्याने 7.59 च्या इकॉनॉमीवर धावा खर्च केल्या.
हेही वाचा-
भारतीय संघात परतणार ‘हा’ स्टार खेळाडू? केलं मोठं वक्तव्य म्हणाला….
कोण आहेत रोहन जेटली? जे जय शाह यांच्यानंतर बीसीसीआयचे सचिव बनू शकतात
बांग्लादेश मालिकेपूर्वी श्रेयस अय्यर नव्या भूमिकेत; गौतम गंभीरचा डाव?