---Advertisement---

IPL 2026 Final: मैदानावरच भिडले विराट कोहली आणि साई सुदर्शन! वादाचा व्हिडिओ व्हायरल

On: सोमवार, जून 1, 2026 3:08 PM
---Advertisement---

आयपीएल 2026 चा अंतिम सामना रविवारी (31 मे) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात आरसीबीचे खेळाडू शांत दिसले, आणि त्यांनी जीटीला 5 विकेट्सने पराभूत करत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. या सामन्यादरम्यान काही वेळेला दोन्ही संघांतील खेळाडू आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकले नाहीत.

या सामन्यात जीटीने प्रथम फलंदाजी करताना 156 धावसंख्या उभारली. या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीच्या डावातील सातव्या षटकात विराट कोहली आणि साई सुदर्शन यांच्यात शाब्दिक चकमक होताना दिसली. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये सुदर्शन विराटचे लक्ष विचलित करण्याच्या प्रयत्नात दिसत आहे. तसेच जीटीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आरसीबीची सलामीवीर व्यंकटेश अय्यरसोबत काही चर्चा करताना दिसला. जेव्हा सामन्याची स्थिती आपल्या विरूद्ध जात असल्याचे दिसत असताना सिराजने स्वत: ला प्रेरित करण्यासाठी आणि खेळामध्ये काही भावना आणण्याचा प्रयत्न करताना दिसला.

तसेच 15.6 व्या षटकांत विराटचा झेल शुबमन गिलने घेतला होता, तेव्हा विराटने त्याला झेल नीट पकडला होता का असे विचारताना दिसला. चेंडू जमिनीला लागल्याचे टीव्ही अंपायरला दिसले आणि विराट नाबाद राहिला. तेव्हा गिल निराश दिसला आणि विराटने नाबाद राहिल्याने जल्लोष केला. यामध्ये विराट 42 चेंडूंत 75 धावा करत नाबाद राहिला आणि त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. सामन्यानंतर त्याने संघाचा रणनीती आणि मैदानावर तसेच मैदानाबाहेर प्रत्येकाशी आदराने वागायचे आणि कोणाला डिवचायचे नाही, याबद्दल वक्तव्य केले.

विराट म्हणाला, “गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवणे आमचे लक्ष्य होतो आणि आम्ही ते साध्य केले. त्यानंतर प्रश्न एवढाच होता की बऱ्याच लोकांनी आम्हाला हा प्रश्न केला की अंतिम सामन्यात तुम्ही कोणाला पसंती द्याल? आमच्यासमोर कोणती जर्सी आहे याची आम्हाला पर्वा नाही. आम्ही उत्कृष्ट क्रिकेट खेळत आहोत. आम्हाला आमच्या संघाच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करायचे आहे, इतर संघांवर नाही. आम्ही इतर सर्व संघांचा आदर करतो आणि मुद्दाम दुसऱ्या संघाला डिवचत नाही.”

“आमच्या संघात अनेक परिपक्व खेळाडू आहेत, अनेक अनुभवी खेळाडू आहेत आणफ कठिण परिस्थितीत अनुभव नेहमीच कामी येतो. जेव्हा मोठे प्रसंग येतात, तेव्हा मोठ्या खेळाडूंना पुढे येण्याची गरज असते आणि आम्ही नेमके तेच केले”, असेही विराटने पुढे म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---