---Advertisement---

आयपीएल 2026: केकेआरविरुद्धचा रेकॉर्ड पाहता 14 वर्षाचा ‘हा’ इतिहास बदलण्याची संधी मुंबई इंडियन्सकडे

On: रविवार, मार्च 29, 2026 5:33 PM
---Advertisement---

आयपीएल २०२६ च्या हंगामातील दुसरा सामना आज (रविवार, २९ मार्च) मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) असा रंगणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. घरच्या मैदानावर मुंबईला १४ वर्षाचा इतिहास बदलण्याची संधी आहे. तसेच या सामन्यामध्ये यावर्षी टी२० मध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूचा जलवा दिसणार आहे.

घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्स एक बलाढ्य संघ आहे. त्यांनी ९२ सामन्यांत ५७ विजय मिळवले आहेत, मात्र सलामीच्या सामन्यात मुंबईची कामगिरी चांगली नाही, त्यांनी चार सामने गमावले आहेत.

मुंबई इंडियन्सने सलग १३ हंगामांमध्ये आणि एकूण १८ हंगामांपैकी १४ हंगामांमध्ये आपला सलामीचा सामना गमावला आहे. मुंबईने आयपीएलचा पहिला सामना शेवटी २०१२ मध्ये जिंकला आहे. तेव्हा चेन्नई सुपर किंग्जला त्यांनी त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभवाचा धक्का दिला होता. त्यानंतर झालेल्या सर्व हंगामांमध्ये मुंबईने पहिला सामना गमावला आहे. यामुळे पाच वेळेचा विजेत्या मुंबईला हा १४ वर्षांचा दुष्काळ संपवण्याची संधी आहे. तसेच केकेआर विरुद्ध मुंबईचा रेकॉर्ड उत्तम आहे. संघाने खेळलेले ३५ पैकी २४ सामने जिंकले आहेत.

दुसरीकडे केकेआरचा मुंबईविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर रेकॉर्ड चांगला नाही. त्यांनी १२ पैकी केवळ दोनच सामने जिंकले आहेत. पहिला सामना २०१२ आणि दुसरा सामना २०२४ मध्ये, मात्र केकेआरने आज चांगला खेळ केला तर मुंबईसाठी कठीण होईल.

मुंबईसाठी जसप्रीत बुमराह निवडीसाठी उपलब्ध आहे. त्याच्या प्रभावी गोलंदाजीने तो संघाचा प्रमुख बनला गोलंदाज आहे. तसेच केकेआरने त्यांच्या संघात फिन ऍलनला घेतले आहे. त्याला २ कोटी रुपयांना करारबद्ध केले आहे. त्याने २०२६ च्या १६ टी२० सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारले आहेत. त्यामुळे तो मुंबईविरुद्ध कशी सुरूवात करतो, याकडे लक्ष असणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---