---Advertisement---

RRvsCSK: सामन्याआधी धोनीशी बोलणे झाले का हे विचारताच रवींद्र जडेजा म्हणाला, “माहीसोबत बोलणे…”

On: मंगळवार, मार्च 31, 2026 4:23 PM
---Advertisement---

भारताचा अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा आयपीएल २०२६ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे. त्याने सोमवारी (३० मार्च) गुवाहाटीमध्ये झालेल्या सामन्यात त्याच्या आधीचा संघ चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध उत्तम कामगिरी केली. हा सामना राजस्थानने ८ विकेट्सने जिंकला. सामन्यानंतर जडेजाने त्याच्या गोलंदाजीबरोबर एमएस धोनीबाबत केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

या सामन्यात जडेजाने ३ षटकात १८ धावा देत २ विकेट्स घेतल्या. त्याने गोलंदाजीतील बदल आणि मिळणाऱ्या स्विंगचा वापर करून चेन्नईच्या फलंदाजी फळीला उद्ध्वस्त केले. त्यामुळे चेन्नईने १९.४ षटकात १० विकेट्स गमावत १२७ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानकडून वैभव सूर्यवंशीने १७ चेंडूत ५२ धावा केल्या. त्याला यशस्वी जायसवालची योग्य साथ मिळाली. तो ३८ धावा करत नाबाद राहिला. त्यामुळे राजस्थानने १२.१ षटकातच लक्ष्य पार केले आणि हंगामाची विजयी सुरूवात केली.

सामन्यानंतर जियोस्टारशी बोलताना जडेजाने धोनीशी या सामन्याआधी बोलणे झाले नाही, असा आश्चर्यकारक खुलासा केला आहे. त्याने म्हटले, “बोलणे झाले नाही, कारण माही त्याचा फोन बंद ठेवतो.” पुढे तो हसून म्हणाला, “जेव्हा त्याच्याशी भेट होईल तेव्हा खूप गप्पा मारणार.”

जडेजाने त्याच्या आयपीएल प्रवासाची सुरूवात राजस्थानसोबतच केली आहे. तो २००८ च्या विजेत्या संघाचा भाग राहिला आहे. त्यानंतर तो २०१२ मध्ये चेन्नईमध्ये गेला. त्यानंतर तो एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली संघाचा प्रमुख भाग बनला. तेथे त्याने चेन्नईसोबत तीन आयपीएल विजेतेपद जिंकले. त्याने २०१८, २०२१ आणि २०२३ च्या विजेतेपदांमध्ये महत्वाची कामगिरी केली होती. २०२६ च्या हंगामाआधी तो ट्रेडद्वारे राजस्थानमध्ये परतला.

पुन्हा राजस्थानमध्ये परतल्यावर जडेजा म्हणाला, “मला वाटते माझ्यावर गुलाबी रंग चांगला दिसतो.” त्याने या सामन्यात इम्पॅक्ट प्लेयर सरफराज खान आणि शिवम दुबेची विकेट घेतली, त्यामुळे चेन्नईच्या धावांचा वेग कमी झाला. त्याने दुबेची विकेट घेतल्यानंतर केलेले सेलिब्रेशनही खूप व्हायरल झाले आहे. त्याच्या या सामन्यात दोन्ही प्रकारचे रूप दिसले, आक्रमक आणि भावूक.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---