बुधवारी (१८ मे) मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आमना सामना झाला. लखनऊच्या सलामीवीर जोडीने या सामन्यात विक्रमांची रास लावली आणि इतिहास घडवला. केएल राहुल आणि क्विंटन डी कॉकने मिळून आतापर्यंतची आयपीएलमधील सर्वात मोठी सलामीवीरांची भागीदारी साकारली. त्याव्यतिरिक्त इतर अनेक विक्रम त्यांनी नावावर केला.
लखनऊचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) याने सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. राहुल आणि क्विंटन डी कॉक (Quinton De Kock) डावाची सुरुवात करण्यासाठी आले आणि शेवटपर्यंत नाबाद राहिले. दोघांनी मिळून २१० धावांची भागीदारी केली आणि केकेआरला विजयासाठी २११ धावांचे लक्ष्य मिळाले. यामध्ये डी कॉकने ७० चेंडूत २०० च्या स्ट्राईक रेटसह १४० धावांचे योगदान दिले. या धावा करण्यासाठी त्याने १० चौकार आणि १० षटकार मारले. राहुलने ५१ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६८ धावा केल्या.
दरम्यान, ही पहिली वेळ आहे जेव्हा आयपीएलमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने एकही विकेट गमावली नाहीये. लखनऊ सुपर जायंट्ससाठी हा त्यांचा पहिला आयपीएल हंगाम आहे आणि त्यांनी पहिल्याच हंगामात ही कामगिरी करून दाखवली आहे. तसेच लखनऊने जी धावसंख्या उभी केली, ती आयपीएलच्या इतिहासात एकही विकेट न गमावता उभी केली गेलेली सर्वात मोठी संघिक धावसंख्या आहे.
आयपीएलमध्ये एकही विकेट न गमावता उभी केलेली सर्वोत मोठी सांघिक धावसंख्या-
२१०/० – लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (२०२२)
१८४/० – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स २०१७
१८१/० – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज (२०२०)
१८१/० – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स (२०२१)
१६३/० – मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (२०१२)
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
अजून कोणाकडून नव्हे तर ‘अंपायर’कडून उमरान मलिक शिकलाय ‘पंच सेलिब्रेशन’ची स्टाईल
केन विलियम्सच्या अनुपस्थितीत ‘हे’ तीन खेळाडू सांभाळू शकतात सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्त्वपद
गेल, मॅक्यूलम सारखंच क्विंटन डिकाॅक हे नाव पण आदरानेच घ्या, कारण भावाने रेकॉर्डच तसा केलाय!