इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेच्या धर्तीवर बीसीसीआयने महिला प्रीमिअर लीग सुरू केली. या स्पर्धेमुळे बीसीसीआयने महिलांना आर्थिकदृष्ट्या पाठबळ दिले. आता याच महिला या स्पर्धेमध्ये विक्रमांचे मनोरे रचताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, मुंबई इंडियन्स संघाची खेळाडू हरमनप्रीत कौर हिने स्पर्धेत ज्याप्रकारे मुंबईचे नेतृत्व केले ते वाखाणण्याजोगे आहे. तिने मुंबईला स्पर्धेतील सर्वोत्तम संघ बनवले. आता याच हरमनप्रीतने एक असा विक्रम केला आहे. विशेष म्हणजे, असा कारनामा आयपीएलमध्येही झाला होता.
मंगळवारी (दि. 14 मार्च) महिला प्रीमिअर लीग 2023 (Womens Premier League 2023) स्पर्धेतील 12वा सामना मुंबई इंडियन्स महिला विरुद्ध गुजरात जायंट्स महिला (Mumbai Indians Women vs Gujarat Giants) संघात पार पडला. हा सामना मुंबईने 55 धावांनी जिंकला. हा मुंबईचा स्पर्धेतील सलग पाचवा विजय होता. ही कामगिरीमुंबईने हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिच्या नेतृत्वाखाली करून दाखवली. यासोबतच हरमनप्रीत डब्ल्यूपीएल (WPL) स्पर्धेत सलग पाच सामने जिंकणारी पहिलीच कर्णधार बनली.
तिच्या नेतृत्वाखाली मुंबईने पहिल्या सामन्यात गुजरात जायंट्स संघाला 143 धावांनी पराभूत केले होते. तसेच, दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला 9 विकेट्सने पराभूत केले होते. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सवर 8 विकेट्सने विजय मिळवला होता, तर यूपी वॉरियर्झलाही 8 विकेट्सनेच धूळ चारली होती. त्यानंतर आता स्पर्धेच्या 12व्या सामन्यात गुजरातला पुन्हा पराभूत केले.
𝐅𝐈𝐕𝐄 𝐒𝐓𝐀𝐑 𝐏𝐄𝐑𝐅𝐎𝐑𝐌𝐀𝐍𝐂𝐄 ⭐⭐⭐⭐⭐#OneFamily #MumbaiIndians #AaliRe #MIvGG pic.twitter.com/V4PUv4Iz06
— Mumbai Indians (@mipaltan) March 14, 2023
आयपीएलमध्ये कोणत्या कर्णधाराने केलेला कारनामा?
डब्ल्यूपीएलमध्ये हरमनप्रीतने जो सलग पाच सामने जिंकण्याचा कारनामा केला, तो कारनामा 2014च्या आयपीएल हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाब (आताचे पंजाब किंग्स) संघाचा कर्णधार जॉर्ज बेली (George Bailey) याने केला होता.
बेलीच्या नेतृत्वाखाली पंजाबने पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला 6 विकेट्सने पराभूत केले होते. दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला 7 विकेट्सने पराभूत केले होते. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात हैदराबादला 72 धावांनी मात दिली होती. चौथ्या सामन्यात कोलकाताला 23 धावांनी पछाडले होते, तर पाचव्या सामन्यात बेंगलोर संघाचा 5 विकेट्सने धुव्वा उडवला होता.
अशाप्रकारे आयपीएल आणि डब्ल्यूपीएलमध्ये सलग पाच सामने जिंकणारे कर्णधार (Captains Who Won consecutive 5 matches in ipl and wpl) हे जॉर्ज बेली आणि हरमनप्रीत कौर आहेत. (IPL and WPL Captains to win first 5 games know their name)
आयपीएल/डब्ल्यूपीएल स्पर्धेतील पहिले 5 सामने जिंकणारे कर्णधार
आयपीएल- जॉर्ज बेली (2014)
डब्ल्यूपीएल- हरमनप्रीत कौर (2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
प्ले-ऑफचे तिकीट ते टेबल टॉपर, 5वा विजय मिळवताच मुंबईने केले ‘हे’ 4 कारनामे; क्रिकेटप्रेमींनी वाचाच
मुंबईच्या विजय रथाखाली चिरडली गुजरात! 55 धावांनी विजय मिळवत हरमनसेना प्ले-ऑफसाठी क्वालिफाय