आज 2020 आयपीएलसाठी कोलकाता येथे लिलाव सुरु आहे. आज 338 खेळाडूंचा लिलाव होणार आहे. यामध्ये आत्तापर्यंत पहिल्या सत्रातच मोठ्या बोली लागल्या आहेत. यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू ख्रिस मॉरिसला 10 कोटींची बोली लागली आहे.
त्याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने 10 कोटी रुपये मोजत संघात सामील करुन घेतली आहे. तो या लिलावातील पहिल्या सत्रातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
A good deal by @RCBTweets for all-rounder @Tipo_Morris you reckon? @Vivo_India #IPLAuction pic.twitter.com/o3eG8RyZCt
— IndianPremierLeague (@IPL) December 19, 2019
या आयपीएल लिलावात आत्तापर्यंत सर्वात महागडा खेळाडू ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू पॅट कमिन्स ठरला आहे. त्याच्यासाठी तब्बल 15 कोटी 50 लाखांची किंमत कोलकाता नाईट रायडर्सने मोजली आहे.
तर ग्लेन मॅक्सवेल दुसऱ्या क्रमांकाचा महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला किंग्स इलेव्हन पंजाबने 10 कोटी 75 लाखांची बोली लावत संघात सामील करुन घेतले आहे.
म़ॉरिसने 2019 चा आयपीएल दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळले असून या मोसमात त्याने 9 सामन्यात 13 विकेट्स घेतल्या आहेत.
तसेच त्याने आत्तापर्यंत 61 आयपीएल सामन्यात 517 धावा केल्या आहेत आणि 69 विकेट्स घेतल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या या दोन खेळाडूंना लागली तब्बल १० कोटींपेक्षाही जास्त किमतीची बोली https://t.co/cahK06m1Nv#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT #IPL2020Auction
— Maha Sports (@Maha_Sports) December 19, 2019
मुंबई इंडियन्सने सुरुवातीलाच खरेदी केला हा दिग्गज खेळाडूhttps://t.co/uHmsF44g8R#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT #IPL2020Auction
— Maha Sports (@Maha_Sports) December 19, 2019