आयपीएल २०२१ च्या पार्श्वभूमीवर, चेन्नईत १८ फेब्रुवारी रोजी खेळाडूंचा लिलाव करण्यात येणार आहे. अशातच २९२ खेळाडूंपैकी अधिकतर ६१ खेळाडूंना आयपीएलच्या १४ व्या हंगामासाठी बोली लागू शकते. अशातच अनेक युवा भारतीय खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतून आपली प्रतिभा दाखवली आहे. यात मोहम्मद अझहरुद्दीन या केरळकडून खेळणाऱ्या खेळाडूनेही सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
संजू सॅमसन याला आपला रोल मॉडेल मानणाऱ्या मोहम्मद अझहरुद्दीन याने नुकत्याच पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफीदरम्यान सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २०१५ साली केरळ संघासाठी पदार्पण करणाऱ्या यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद अझहरुद्दीन याने नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली टी -२० स्पर्धेत मुंबई संघाविरुद्ध अवघ्या ३७ चेंडूत शतक झळकावले होते.
सय्यद मुश्ताक अली टी -२० स्पर्धेतील कामगिरी
नुकत्याच पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली टी -२० स्पर्धेत केरळच्या या फलंदाजाने आपल्या फलंदाजीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. त्याने या स्पर्धेत एकूण ५ सामन्यात ५३ च्या सरासरीने एकूण २१४ धावा केल्या होत्या. यात त्याने १५ षटकार लगावले होते. आयपीएलमध्ये असे अनेक संघ आहेत ज्यांना यष्टिरक्षक फलंदाजाची गरज आहे. यामुळे मोहम्मद अझहरुद्दीन याला संघात समाविष्ट करण्यासाठी कोट्यावधी रुपयांची बोली लागू शकते. या लिलावात बोली लावण्यासाठी त्याची मूळ किंमत २० लाख इतकी आहे.
संजू सॅमसनला मानतो आपला आदर्श
२६ वर्षीय युवा फलंदाज मोहम्मद अझहरूद्दीन हा भारतीय यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनला आपले आदर्श मानतो. त्याच्या नजरेत संजू सॅमसन हा उत्कृष्ट यष्टिरक्षकासोबत उत्कृष्ट फलंदाज देखील आहे. तसेच संजू सॅमसन बद्दल तो म्हणाला की, संजू सॅमसनने दिलेल्या सल्ल्यावर कधीच दुर्लक्ष करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
अन् विराट कोहली ‘त्या’ एका फोटोमुळे झाला सोशल मीडियावर ट्रेंड, मीम्स होतायेत व्हायरल
काय सांगता ? वयाच्या ४७ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण, ‘या’ खेळाडूने केला होता विश्वविक्रम
देशांतर्गत क्रिकेट गाजवणाऱ्या ‘या’ पाच भारतीय क्रिकेटपटूंवर आयपीएल लिलावात पडणार पैशाचा पाऊस?