---Advertisement---

IPL Auction: डेव्हिड वॉर्नरची घरवापसी! दिल्ली कॅपिटल्सने ‘एवढ्या’ कोटींसह घेतले विकत

On: शनिवार, फेब्रुवारी 12, 2022 12:57 PM
david wa
---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीगचा यावर्षी १५ वा हंगाम खेळवला जाणार आहे. या हंगामापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी लिलाव झाला. बंगळुरू येथे झालेल्या या लिलावात अनेक स्टार खेळाडू सहभागी होते. या लिलावात गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स या दोन नव्या संघांनीही जुन्या ८ संघांसह सहभाग घेतला होता. त्यामुळे एकूण १० संघात खेळाडूंना खरेदी करण्यासाठी चांगलीच चुरस पाहायला मिळाली आहे. दरम्यान, या लिलावात सर्वात जास्त लक्षवेधक चेहरा होता, तो म्हणजे डेव्हिड वॉर्नर

या लिलावासाठी २ कोटी मुळ किंमत असलेल्या डेव्हिड वॉर्नरला खरेदी करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघांमध्ये चुरस पाहायला मिळाली. अखेर दिल्ली संघाने बाजी मारत ऑस्ट्रेलियाच्या या धडाकेबाज खेळाडूला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. वॉर्नरला ६.२५ कोटींसह दिल्लीने विकत घेतले. विशेष म्हणजे वॉर्नरने आयपीएल कारकिर्द दिल्ली संघाकडूनच सुरुवात केली होती.

वॉर्नर आयपीएलमधील एक यशस्वी खेळाडू असून त्याने आत्तापर्यंत १५० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ५४०० हून अधिक धावा केल्या असून ५४ वेळा त्याने ५० धावांचा आकडा पार केला आहे.

वॉर्नर गेले काही वर्षे सनरायझर्स हैदराबादकडून आयपीएलमध्ये खेळला आहे. मात्र, गेल्यावर्षी त्याच्यात आणि संघव्यवस्थापनातील वाद सर्वांसमोर आले. अखेर त्यानंतर वॉर्नर आणि हैदराबाद संघांनी आपले मार्ग वेगवेगळे केले. त्याचमुळे वॉर्नरला हैदराबाद संघाने लिलावापूर्वी मुक्त केले होते.

महत्त्वाच्या बातम्या – 

आयपीएल मेगा ऑक्शनबद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला कोणीही सांगणार नाही, घ्या जाणून एकाच क्लिकवर

मेगा लिलावात होणारी ‘एक्सेलरेशन बिडींग’ म्हणजे काय रे भाऊ?

IPL Auction 2022 | विश्वविजेत्या टीम इंडिया U19 संघातील १० खेळाडू मेगा लिलावात सामील, वाचा नावे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---