Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

क्रिकेटपटूंवरही चढला ‘पुष्पा’ फिवर! वॉर्नर, धवन, जडेजा यांचे रिल्स एकदा पाहाच

क्रिकेटपटूंवरही चढला 'पुष्पा' फिवर! वॉर्नर, धवन, जडेजा यांचे रिल्स एकदा पाहाच

January 14, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
David Warner,Ravindra Jadeja and Shikhar Dhawan

Photo Courtesy: Instagram


गेल्या काही दिवसांपासून ‘पुष्पा’ (Pushpa movie) या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता अल्लु अर्जुन (allu arjun)  याने या चित्रपटात प्रमुख भूमिका बजावली आहे. तसेच त्याला साथ मिळाली आहे ती प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मीका मंधानाची. या दोघांची जोडी सध्या चर्चेचा विषय ठरतेय. या चित्रपटात ॲक्शन, रोमान्स, कॉमेडी सर्व काही आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटात डायलॉग. ज्याचे रिल्स व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. दरम्यान, काही प्रसिद्ध क्रिकेटपटूंनी देखील या डायलॉग वर रिल्स व्हिडिओ बनवले आहेत. जे सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताय.

१) डेविड वॉर्नर (David Warner): ऑस्ट्रेलिया संघाचा विस्फोटक फलंदाज डेविड वॉर्नर हा अल्लु अर्जुनचा फॅन आहे. याचा उल्लेख त्याने अनेकदा केला आहे. तो इंस्टाग्रामवर रिल्स व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. काही दिवसांपूर्वी त्याने पुष्पा या चित्रपटातील डायलॉगचा व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडिओला ५ लाख ९० हजारांपेक्षा अधिक लोकांनी लाईक केले आहे.

View this post on Instagram

A post shared by David Warner (@davidwarner31)

२) रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja)  : सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये कसोटी आणि वनडे मालिका सुरू आहे. रवींद्र जडेजा या दोन्ही मालिकेतून दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. दरम्यान रिकाम्या वेळेत तो देखील रिल्स व्हिडिओ शेअर करताना दिसतोय. काही दिवसांपूर्वी त्याने अल्लु अर्जुनच्या लूकची हुबेहूब कॉपी करत त्याच्या डायलॉगचा व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओला देखील चाहत्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. ४ मिलियन पेक्षा जास्त फॉलोवर्स असलेल्या रवींद्र जडेचाचा हा व्हिडिओ ५२ लाखांपेक्षा अधिक लोकांनी केला होता.

View this post on Instagram

A post shared by Ravindrasinh jadeja (@ravindra.jadeja)

३) शिखर धवन (Shikhar Dhawan) : भारतीय संघाचा डाव्या हाताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन देखील सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो नेहमीच मजेशीर व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. रवींद्र जडेजा आणि डेविड वॉर्नर नंतर शिखर धवनचा देखील पुष्पा फिव्हर पाहायला मिळाला आहे. त्याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर ‘ पुष्पा… पुष्पराज.. मरेगा नही..’ या डायलॉगचा व्हिडिओ शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial)

हा व्हिडिओ देखील चाहत्यांच्या पसंतीचा ठरतोय. या व्हिडिओला आतापर्यंत ८ लाख लोकांनी लाईक केले आहे.

महत्वाच्या बातम्या : 

कोण आहे हा युवा वादळी फलंदाज? ज्याच्यामागे धावतायेत चार-चार आयपीएल संघ

आयपीएल २०२२ स्पर्धा कुठे होणार? काय आहे बीसीसीआयचा ‘प्लॅन बी’, घ्या जाणून

हे नक्की पाहा :


Next Post
Rishabh Pant

"रिमेंबर द नेम, रिषभ पंत", शतकी खेळीनंतर चाहते भलतेच खुश, दिल्या अशा प्रतिक्रीया

djokovich

टेनिसपटू नोवाक जोकोविचवर ओढावली संक्रात, ऑस्ट्रेलियन सरकारकडून व्हिसा दुसऱ्यांदा रद्द

Sam-Billings

इंग्लंडकडून पदार्पण करणारा ६९९ वा खेळाडू असूनही बिलिंग्सला मिळाली ७०० क्रमांकाची कॅप, वाचा त्यामागची ईनसाईड स्टोरी

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143